भुजबळांना रोहिणी आयोग समजला नाही, सबकॅटीगरीशन कळत नाही; हरिभाऊ राठोडांचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 18:08 IST2023-12-06T18:06:32+5:302023-12-06T18:08:14+5:30
भुजबळ यांना शरद पवार यांनी मोठे केले. मात्र, त्यांनीच पवार यांची साथ सोडली. पक्षात तर फूट भुजबळ यांनी पाडली. त्यालाच फूट म्हणतात, असा टोला राठोड यांनी लगावला.

भुजबळांना रोहिणी आयोग समजला नाही, सबकॅटीगरीशन कळत नाही; हरिभाऊ राठोडांचा पलटवार
हरिभाऊ राठोड यांनी ओबीसींमध्ये फुट पाडण्याचा अनेक वर्षांपासून प्रयत्न असल्याचा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केला होता. यावर माजी खासदारांनी पलटवार केला आहे.
भुजबळ यांना ओबीसी सबकॅटीगीरीशन कळत नाही असा पलटवार माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केला आहे. भुजबळ यांना रोहिणी आयोग समजला नाही. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाबाबत सूचना दिल्या आहेत, असे राठोड म्हणाले.
भुजबळ यांना शरद पवार यांनी मोठे केले. मात्र, त्यांनीच पवार यांची साथ सोडली. पक्षात तर फूट भुजबळ यांनी पाडली. त्यालाच फूट म्हणतात, असा टोला राठोड यांनी लगावला.
भुजबळ काय म्हणालेले...
राठोड हे ओबीसींमध्ये फुट पाडण्याचा गेली कित्येक वर्षे प्रयत्न करत आहेत. आता राज्यात सर्व मराठ्यांना कुणबी दाखले मिळत आहेत. कुठे दादागिरी करून कुठे काय करून ते मिळविले जात आहेत. यापुढेही ते मिळत राहतील. यामुळे राज्याच एकही मराठा शिल्लक राहणार नाही, असे भुजबळ म्हणाले. विधानसभेबाहेर भुजबळ पत्रकारांशी बोलत होते.