भिवंडी पालिका कर्मचारी पगारापासून वंचित
By Admin | Updated: April 29, 2016 04:27 IST2016-04-29T04:27:12+5:302016-04-29T04:27:12+5:30
दोन महिन्यांपासून मनपा कर्मचाऱ्यांना पगार न मिळाल्याने ते हवालदिल झाले आहेत.

भिवंडी पालिका कर्मचारी पगारापासून वंचित
भिवंडी : दोन महिन्यांपासून मनपा कर्मचाऱ्यांना पगार न मिळाल्याने ते हवालदिल झाले आहेत. काही कामगार कर्जबाजारी होत आहेत.
मागील आर्थिक वर्षात चांगली वसुली झाल्याने काही अधिकाऱ्यांनी आपली पाठ थोपटून घेतली होती. अशा स्थितीत मार्च व एप्रिल महिन्याचा पगार झालेला नाही. राज्य सरकारकडूनही अपेक्षित निधी मिळत असतानाही केवळ कंत्राटदारांची बिले देण्यात प्रशासन गुंतल्याचा आरोप करत पालिका कर्मचाऱ्यांमध्ये दिवसेंदिवस असंतोष वाढत आहे.
एलबीटी बंद झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा पगार नियमित व वेळेवर होण्यासाठी सरकारकडून आगाऊ रकमेचा धनादेश येतो. तरीही प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर केले जात नाहीत. (प्रतिनिधी)