शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीमध्ये भाजपला मोठा धक्का! महापौर पदाचा पहिला उमेदवार ९ नगरसेवकांसह फुटला, काँग्रेसचे त्याला मतदान करण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 11:46 IST

Bhiwandi Mayoral Election Update 2026: भिवंडी महानगरपालिका महापौर निवडणुकीत राजकीय भूकंप. भाजपचे ९ नगरसेवक काँग्रेसच्या वाटेवर. नारायण चौधरी यांची नाराजी भाजपला महाग पडणार? वाचा सविस्तर.

भिवंडी: भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षांतर्गत वाद आणि उमेदवारी बदलाच्या निर्णयामुळे नाराज झालेल्या ९ नगरसेवकांनी बंडाचे निशाण फडकवले असून, त्यांनी काँग्रेस पुरस्कृत 'भिवंडी सेक्युलर फ्रंट'ला पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे भाजपच्या हातून महापौरपदाची खुर्ची निसटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपने सुरुवातीला नारायण चौधरी यांचे नाव महापौरपदासाठी निश्चित केले होते. त्यांनी अर्ज भरल्यानंतर भाजपाने ऐनवेळी स्नेहा पाटील यांना उमेदवारी जाहीर करत अर्ज भरायला लावला. पक्षाच्या या अनपेक्षित निर्णयामुळे चौधरी गट प्रचंड नाराज झाला. चौधरी यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त करत ८ इतर नगरसेवकांसह भाजपपासून अंतर राखले आहे.  भिवंडी महापालिकेत एकूण ९० जागा असून बहुमतासाठी ४६ मतांची गरज आहे. सध्या काँग्रेसकडे ३० जागा, राष्ट्रवादी (शरद पवार गट) १२ जागा, भाजप बंडखोर (चौधरी गट) ९ नगरसेवक असा संभाव्य आघाडीचा बहुमताचा आकडा ५१ वर जात आहे. 

चौधरी गट बाजुला झाल्याने मूळ भाजपकडे आता केवळ १३ नगरसेवक उरले आहेत. भाजपचे एकूण २२ नगरसेवक निवडून आले होते. शिवसेना (शिंदे गट) आणि इतर छोट्या आघाड्यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात असली, तरी अंकगणित पाहता काँग्रेसचा विजय सुकर होताना दिसत आहे. २० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या निवडणुकीत आता संपूर्ण राज्याचे लक्ष भिवंडीच्या निकालाकडे लागले आहे.

'काँग्रेस'चा भाजप उमेदवाराला पाठिंबाभिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीत एकापाठोपाठ एक धक्कादायक वळणे येत आहेत. महायुतीमध्ये उभी फूट पडली असतानाच, आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आपल्या नगरसेवकांसाठी एक खळबळजनक 'व्हीप'  जारी केला आहे. महापौरपदासाठी भाजपचे बंडखोर उमेदवार नारायण चौधरी यांना मतदान करण्याचे आदेश काँग्रेसने दिले असून, उपमहापौरपदासाठी काँग्रेसचेच तारीक मोमीन निवडणुकीच्या रिंगणात असतील.

या निर्णयामुळे भिवंडीत एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. जिथे मूळ भाजप स्नेहा पाटील यांच्या पाठीशी आहे, तिथे काँग्रेस चक्क भाजपच्याच एका बंडखोर गटाला साथ देऊन सत्ता काबीज करण्याच्या प्रयत्नात आहे.

महायुतीत बिघाडीदुसरीकडे, शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमधील दरीही वाढली आहे. शिवसेनेचे गटनेते मनोज काटेकर यांनी भाजपवर टीका करत, "भाजपचे उमेदवार पळून गेले आहेत, त्याचे खापर आमच्यावर का फोडता?" असा सवाल केला आहे. यामुळे महायुतीतील घटक पक्षच एकमेकांसमोर ठाकल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Major setback for BJP in Bhiwandi; corporators defect before election.

Web Summary : Bhiwandi BJP faces crisis as 9 corporators defect, backing Congress-supported candidate. Internal disputes over mayoral candidacy led to the rebellion, jeopardizing BJP's chances. Congress strategically supports rebel, aiming to seize power amid Mahayuti discord.
टॅग्स :Bhiwandi Nizampur Municipal Corporation Electionभिवंडी-निजामपूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६bhiwandiभिवंडीBJPभाजपाcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना