भारती ओंबळे उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्त

By Admin | Updated: January 16, 2015 06:02 IST2015-01-16T06:02:58+5:302015-01-16T06:02:58+5:30

मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात अतिरेक्यांचा मुकाबला करताना शहीद झालेले सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम ओंबळे यांची कन्या भारती

Bharti is appointed as Deputy District Collector | भारती ओंबळे उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्त

भारती ओंबळे उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्त

ठाणे : मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात अतिरेक्यांचा मुकाबला करताना शहीद झालेले सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम ओंबळे यांची कन्या भारती हिची शासनाने उपजिल्हाधिकारी गट अ पदावर नियुक्ती केली आहे़ अजमल कसाब या क्रूरकर्म्यास तुकाराम ओंबळे यांनी पकडले होते.
तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या प्रत्येक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांतील सदस्यास शासकीय नोकरी देण्याची घोषणा केली होती़ त्यानंतर, २० जानेवारी २००९ रोजी यासंदर्भात शासनाने जीआर काढला़ मात्र, पुढे काहीच हालचाल झाली नव्हती़ आता सहा वर्षांनंतर हा निर्णय अंमलात आणून ओंबळे कुटुंबीयांची संक्रांत खऱ्या अर्थाने गोड केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Bharti is appointed as Deputy District Collector