शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
3
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
4
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
5
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
6
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
7
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
8
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
9
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
10
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
11
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
12
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
13
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
14
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
15
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
16
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
17
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
18
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
19
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
20
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती

कंपन्याचे प्रॉफिट 200 कोटी अन् देणगी 1300 कोटी; प्रकाश आंबेडकरांचे केंद्रावर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2024 20:21 IST

राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो न्याय यात्रेची आज मुंबईतील शिवाजी पार्कवर सांगता होत आहे.

Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप आज(दि.17) मुंबईमधील छत्रपती शिवाजी पार्कवर झाला. या सभेला विरोधी पक्षांच्या India आघाडीतील अनेक नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी सभेला संबोधित करताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी इलेक्टोरल बाँड्सचा मुद्दा उपस्थित केला. ज्या कंपन्यांचे प्रॉफिट 200 कोटी रुपये आहे, त्यांनी 1300 कोटींचे बाँड्स कसे दिले? असा प्रश्न त्यांनी विचारला. ते पुढे म्हणतात, आपण सर्वांनी मिळून सरकारला याबद्दल प्रश्न विचारला पाहिजे. गृहमंत्री अमित शाह इलेक्टोरल बाँड्सवर भाष्य करतात, त्यांनी आधी याचे उत्तर द्यावे. यावेळी त्यांनी सर्वांना एकत्र येऊन लढण्याचे आवाहनही केले. तसेच, आंबेडकरांनी मोदी का परिवार, या घोषणेवरुन पंतप्रधानांवर खासगी टीकाही केली.

तेजस्वी यादव यांचे महाराष्ट्र आणि केंद्र सरकारवर टीकास्त्रयावेळी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीदेखील सरकारवर जोरदार टीका केली. महाराष्ट्र सरकारमध्ये नेते नाहीत, फक्त डिलर आहेत, असा घणाघात तेजस्वी यादवांनी केला. उद्धव ठाकरेंच्या नावाने मतं मागतात, शरद पवारांच्या नावाने मतं मागतात आणि भाजपशी डिलिंग करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वात मोठे खोटारडे आहेत. मोदी म्हणजे खोटं बोलण्याची फॅक्ट्री आहेत. खोटे बोलण्याचे ते सेलर आणि होलसेलरही आहेत. 

फारुख अब्दुल्ला यांचा EVM वर निशाणायावेळी नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी EVM बाबत मोठे विधान केले आहे. त्यांनी ईव्हीएमला चोर ठरवून आघाडीचे सरकार आल्यास मशीन काढून निवडणूक आयोगाला स्वतंत्र केले जाईल, असे म्हटले. तुम्हाला आपले मत वाचवायचे आहे. हे मशिन (ईव्हीएम) चोर आहे. मशीन काढून टाकण्यासाठी आम्ही खूप आवाज उठवला, पण तसे झाले नाही. 'इंडिया' आघाडीचे सरकार आले, तर मशीन काढून टाकू आणि निवडणूक आयोगाला मुक्त करू, असे ते म्हणाले.

 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राMumbaiमुंबईcongressकाँग्रेसBJPभाजपा