भंडारा : ट्रकखाली चिरडून चालकाचा मृत्यू

By Admin | Updated: September 7, 2016 14:42 IST2016-09-07T14:42:38+5:302016-09-07T14:42:38+5:30

चालत्या ट्रकमधून उडी घेतल्याने चाकखाली दबून जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडा-यात घडली.

Bhandara: The driver dies after being trampled under the truck | भंडारा : ट्रकखाली चिरडून चालकाचा मृत्यू

भंडारा : ट्रकखाली चिरडून चालकाचा मृत्यू

>ऑानलाइन लोकमत
भंडारा, दि. ७ - मंगळवारी रात्री 10 वाजताच्या दरम्यान विरली/बु. येथे रेती वाहून नेणाऱ्या ट्रकचा पोलीस व महसूल अधिकाऱ्यानी पाठलाग करून तीन ट्रक थांबविले. एक ट्रक धूम ठोकून पळाला. चालत्या ट्रकमधून उडी घेतल्याने चाकखाली दबून जागीच मृत्यू झाला.
पहाटे 5 वाजेपर्यंत संपूर्ण नागपूर-पवनी परिसरातील ट्रक चालकांनी लाखांदूर पोलीस ठाण्यासमोर निदर्शने करून रोष व्यक्त केला अखेर पहाटे पवनी येथील पोलीस चौकीला आग लावून या प्रकरणातील दोषीवर कार्यवाहीची मागणी रेटून धरली. जवळपास 300 पेक्षा जास्त ट्रक चालक व मालक तसेच मोठया संख्येने पोलीस ताफा यावेळी हजर होता.

Web Title: Bhandara: The driver dies after being trampled under the truck