भानामतीवर इलाज म्हणून शेण खाऊ घातले

By Admin | Updated: June 14, 2017 00:46 IST2017-06-14T00:46:28+5:302017-06-14T00:46:28+5:30

करणी-भानामती झाली, तुमच्यावर इलाज करतो, असे सांगून दोन महिलांवर अघोरी उपचार केलेल्या चौघांना पोलिसांनी गजाआड केले. प्रभाकर केसाळे, पंडित कोरे, गंगाधर

Bhanamati treated cow dung as treatment | भानामतीवर इलाज म्हणून शेण खाऊ घातले

भानामतीवर इलाज म्हणून शेण खाऊ घातले

- लोकमत न्यूज नेटवर्क

चाकूर (जि. लातूर) : करणी-भानामती झाली, तुमच्यावर इलाज करतो, असे सांगून दोन महिलांवर अघोरी उपचार केलेल्या चौघांना पोलिसांनी गजाआड केले. प्रभाकर केसाळे, पंडित कोरे, गंगाधर शेवाळे व दगडू शेवाळे अशी या भोंदूंची नावे आहेत. याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
धनगरवाडी (ता. चाकूर) येथील दोन महिलांना तुमच्यावर करणी भानामती झाली आहे, म्हणून या चौघांनी अज्ञात स्थळी नेले़ तेथे मारहाण करून हातपाय बांधून अघोरी इलाज केले़ ज्यामध्ये त्या दोघींना शेण खाऊ घातले़ शिवाय सदर प्रकाराची चित्रफीत करून व्हॉट्सअ‍ॅपवर प्रसारित केली़ त्यावेळी आरोपींनी पिडीत महिलांकडून गावातील एकाने भानामती करणी केल्याचे वदवून घेतले़
शेण खातो का? शेण खाल्लास तर तुला सोडतो असे म्हणायला लावून अक्षरश: शेण खाऊ घालून गिळावयास लावले़ अमानुषपणे मारहाण केली़ अनिसचे माधव बावगे यांनी पोलिसांची भेट घेतली़ त्यानंतर चौघांच्या मुसक्या आवळणल्या.

Web Title: Bhanamati treated cow dung as treatment