अवघ्या ४ वर्षांच्या ओम ढाकणेने सर केला सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील कठीण असा भैरवगड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 15:02 IST2022-02-08T15:01:55+5:302022-02-08T15:02:47+5:30
Om Dhakne News: कल्याणच्या ओम ढाकणे या चार वर्षीय मलाने सह्याद्री पर्वत रांगातील सर्वात कठीण समजला जाणारा किल्ले मोरोशीचा भैरव गड सर केला आहे. ओमचीही गड सर करण्याची दुसरी कामगिरी आहे.

अवघ्या ४ वर्षांच्या ओम ढाकणेने सर केला सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील कठीण असा भैरवगड
कल्याण -कल्याणच्या ओम ढाकणे या चार वर्षीय मलाने सह्याद्री पर्वत रांगातील सर्वात कठीण समजला जाणारा किल्ले मोरोशीचा भैरव गड सर केला आहे. ओमचीही गड सर करण्याची दुसरी कामगिरी आहे. त्याने या आधी कल्याणनजीकचा मलंग गड सर केला होता. सर्वात लहान वयागातील गिर्यारोहक म्हणून त्याने ही कामगिरी बजावली आहे. त्याच्या या कामगिरीमुळे कल्याणचे नाव पुन्हा एकदा उंचावले आहे.
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटाखाली मोरोशी गावाच्या बाजूला असलेल्या चार हजार फूट उंच आणि चाळीस पन्नास फूट रुंद असा भिंतीसारखा दिसणारा लोभसवाणा डोंगर. या डोंगरामुळे सूर्य किरणो आडविली जातात. आजूबाजूला सरसोट कडे, दुस:या बाजूला सरसोट भिंत आणि बाजूलाच पोटात कोर असा भीमरुपी कडा आहे. कल्याणच्या सह्याद्री रॉक अॅडव्हेंचर हा गिर्यारोहक संघ सह्याद्रीच्या खो:यात धाडसी गिर्यारोहणाच्या मोहिमा आखत असतो. संघाचे पवन घुगे, दर्शन देशमुख, रणजित भोसले, भूषण पवार, अक्षय जमदरे, राजेश गायकर, प्रशिल अंबाडे, लतीकेश कदम आणि विकी बोरकूले ह्यांनी ओमला भैरव गड सर करण्यात सहकार्य केले.
मध्यरात्री एक वाजता मोरोशी गावातून या ट्रेकला सुरुवात झाली. जंगलातील वाट तूटवित मोरोशीच्या भैरव गडाच्या माचीवर सुमारे तीन वाजता पोहचले. त्याठिकाणी थोडा वेळ आराम करुन पुन्हा एकदा कडय़ाच्या पायथ्याशी पोहचण्यास एक तास लागला. अशा प्रकारे ओमने हा गड सर केला.