शहरं
Join us  
Trending Stories
1
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
2
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
4
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
5
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
6
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
7
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
8
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
9
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
10
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
11
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
12
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
13
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
14
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
15
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
16
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
17
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
18
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
19
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
20
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले

भगव्या झेंडेधारकांनी दगडफेक केली नाही; साक्षीदाराची आयोगाला माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 06:35 IST

कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी चौकशी आयोगाच्या बुधवारच्या पहिल्या सुनावणीत ठाणे येथील एका महिलेने साक्ष नोंदविली. कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या या महिलेच्या समोर बसवर दगडफेक करण्यात आली होती.

मुंबई : कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी चौकशी आयोगाच्या बुधवारच्या पहिल्या सुनावणीत ठाणे येथील एका महिलेने साक्ष नोंदविली. कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या या महिलेच्या समोर बसवर दगडफेक करण्यात आली होती. मात्र, ही दगडफेक बसच्या बाजूने गेलेल्या भगवा झेंडेधारकांनी केली नसून, त्यांच्या बाजूने जाणाऱ्या बाइकस्वारांनी केल्याची माहिती महिला साक्षीदाराने आयोगाला दिली.कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने चौकशी आयोगाची नियुक्ती केली आहे. माजी न्यायाधीश जे. एन. पटेल व माजी मुख्य सचिव सुमित मलिक यांची आयोगावर नियुक्ती करण्यात आली आहे.ठाणे येथे राहणाºया एका ग्राफिक डिझायनरने आयोगापुढे साक्ष नोंदविली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कल्याणकारी संघटनेच्या सभासद असलेल्या महिलेने, आपण कोरेगाव भीमा येथे का गेलो व तिथे काय पाहिले, याची माहिती न्यायालयाला दिली. ४४ वर्षांनंतर आपण पहिल्यांदाच मंडळामुळे कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी १ जानेवारीला सहकुटुंब गेलो होतो. मंडळाचे एकूण ४९ सदस्य आपल्याबरोबर होते. कोरेगाव भीमाला जाण्यासाठी मंडळाच्या अध्यक्षांनी आणि सचिवांनी खासगी बस केली होती. विजयस्तंभापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावरबस थांबविली. विजयस्तंभाकडे जाताना मोठा जमाव धावतपळत मागे फिरला. विजयस्तंभाजवळ दगडफेक होत आहे, तिथे जाऊ नका, अशी सूचना जमावातील काही लोकांनी दिली. त्यामुळे परत फिरलो. मात्र, त्या वेळी आमच्यावरही दगडफेक करण्यात आली. आमच्यातील काही जखमी झाले. आम्ही कसेबसे बसमध्ये गेलो. पुढे गेल्यावर एक जमाव आमच्यासमोर आला. त्यांनी आम्हाला आमच्या बसवरील निळे झेंडे आणि बॅनर्स काढण्याची सूचना केली. ते न उतरविल्यास पाठीमागून येणारा जमाव हल्ला करेल, असा सावधानतेचा इशारा दिला. त्यामुळे आम्ही घाबरून बसवरील झेंडे काढू लागलो, परंतु त्या आधीच एक जमाव आला आणि त्यांनी आमच्या बसवर दगडफेक केली, अशी माहिती साक्षीदाराने उलटतपासणी दरम्यान न्यायालयाला दिली.आज उलटतपासणीकोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी आरोपी असलेले मिलिंद एकबोटे यांच्या वतीने अ‍ॅड. नितीन प्रधान यांनी साक्षीदाराची उलटतपासणी घेतली. प्रधान यांनी हातात भगवे झेंडे घेतलेल्या जमावाने तुमच्या बसवर दगडफेक केली का, असा सवाल साक्षीदाराला केला. त्यावर त्यांनी ‘नाही’ असे उत्तर दिले, तसेच दगडफेक करणाºया जमावाच्या म्होरक्याला आपण ओळखू शकतो, असेही आयोगाला त्यांनी सांगितले. सरकारकडून साक्षीदाराची उलटतपासणी गुरुवारी घेण्यात येणार आहे.

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार