भदंत सुरेई ससाई यांना मुंबईला हलविले

By Admin | Updated: August 10, 2014 01:52 IST2014-08-10T01:52:32+5:302014-08-10T01:52:32+5:30

भदंत आर्य नागाजरुन सुरेई ससाई यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटल येथे हलविण्यात आले. शनिवारी सकाळी एअर अॅम्बुलन्सद्वारे त्यांना मुंबईला नेण्यात आले.

Bhadant Sorey Sawai moved to Mumbai | भदंत सुरेई ससाई यांना मुंबईला हलविले

भदंत सुरेई ससाई यांना मुंबईला हलविले

>नागपूर :  भदंत आर्य नागाजरुन सुरेई ससाई यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटल येथे हलविण्यात आले. शनिवारी सकाळी एअर अॅम्बुलन्सद्वारे त्यांना मुंबईला नेण्यात आले. भदंत सुरेई ससाई यांच्यावर नागपुरातील पंचशील चौक स्थित केअर रुग्णालयात अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते. सध्या त्यांची प्रकृती बरी आहे. तरी पुढील उपचाराच्या दृष्टीने त्यांना मुंबईला नेण्यात आले. त्यांच्यासोबत इंदोरा बुद्धविहार कमिटीचे अमित गडपायले, मध्य रेल्वेचे सेवानिवृत्त अधिकारी विजय मेश्रम, एस.के. गजभिये, जगन तायडे आणि गौतम अंबादे हे सुद्धा गेले आहे. शनिवारी सकाळी त्यांना सोडण्यासाठी विमानतळावर पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, विलास गजघाटे आदी उपस्थित होते. 

Web Title: Bhadant Sorey Sawai moved to Mumbai