परे विस्कळीत, प्रवाशांचे हाल

By Admin | Updated: May 12, 2016 19:58 IST2016-05-12T19:58:24+5:302016-05-12T19:58:24+5:30

मुंबईची लाइफलाइन समजल्या जाणा-या पश्चिम रेल्वेवरची वाहतूक विस्कळीत झाली

Beyond the disorder, the passenger's condition | परे विस्कळीत, प्रवाशांचे हाल

परे विस्कळीत, प्रवाशांचे हाल

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 12- मुंबईची लाइफलाइन समजल्या जाणा-या पश्चिम रेल्वेवरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. पश्चिम उपनगरातील गोरेगाव स्टेशनजवळ सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्यानं वाहतूक उशिरानं सुरू आहे. अप आणि डाऊन मार्गावरील वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. ऐन ऑफिस सुटण्याच्या वेळेत वाहतूक विस्कळीत झाल्यानं प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे दादर स्टेशनवर प्रवाशांची खूपच गर्दी झाली आहे. 
 

Web Title: Beyond the disorder, the passenger's condition