शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

गुढीपाडव्यासाठीचा हा आहे शुभमुहूर्त, जाणून घ्या गुढी उभारण्याची वेळ  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 21:33 IST

चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा होणारा गुढीपाडवा साडेतीन मुहुर्तांपैकी एक आहे. आपल्याकडे गुढीपाडवा म्हणजे वर्षारंभ दिन मानला जातो.

पुणे :  चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा होणारा गुढीपाडवा साडेतीन मुहुर्तांपैकी एक आहे. आपल्याकडे गुढीपाडवा म्हणजे वर्षारंभ दिन मानला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रम्हदेवाने सृष्टीची निर्मिती केली. त्यामुळेच गुढीपूजनाला ब्रम्हध्वजपूजनही म्हटले जाते. सूर्योदयापूर्वी गुढी उभारुन सुर्यास्ताला गुढी उतरवावी, अशी माहिती वसंतराव गाडगीळ यांनी दिली. ब्रम्हाचे पूजन अर्थातच ज्ञानाचे पूजन यादिवशी केले जाते. गुढी उभारताना स्त्री-पुरुष असा कोणताही भेद मानला जात नाही, हेही त्यांनी अधोरेखित केले.

भारतीय पंचांगानुसार, चैत्रवर्षाच्या कालगणनेची सुरुवात शालिवाहन शकापासून झाली. शालिवाहन राजाने शकांचे दमन करुन विजय मिळवला. भारतीय पंचांग शालिवाहन शकाप्रमाणे चालते. त्यामुळेच चैत्र प्रतिपदा हा दिवस नववर्षारंभाचा दिवस मानला जातो. उत्तर भारतामध्ये कार्तिक प्रतिपदेला वर्षारंभ मानले जाते. दक्षिण भारतामध्ये कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या चारही राज्यांमध्ये गुढीपाडव्याला ‘यूगादि’ अर्थात युगारंभ असे म्हटले जाते.

गाडगीळ म्हणाले, ‘भारतीय पंचांगाप्रमाणे, ब्रम्हध्वजपूजन असा मूळ शब्द आहे. संस्कृतचे मराठीकरण झाल्यानंतर प्रतिपदेला पाडवा हा शब्द प्रचलित झाला. तेव्हापासून गुढीपाडवा हा शब्द रुढ झाला. सूर्योदयाच्या पहिल्या प्रहरामध्ये अर्थात सकाळी ६.३० ते ९.३० या वेळेमध्ये गुढी उभारावी. गुढी उभारण्यापूर्वी स्रान, घरच्या देवांची पूजा आणि आई-वडिलांना नमस्कार करावा. दुपारी नैवेद्य दाखवल्यावर सूर्यास्ताला गुढी उतरवावी. 

शक १९४१ चैत्र शुध्द प्रतिपदेला ६ एप्रिल २०१९ रोजी शनिवारी भारतीय नूतन संवत्सर सुरु होत आहे. या दिवशी वैधृति योग असला तरी साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडव्याचा दिवस शुभच आहे. या दिवशी नेहमीप्रमाणे गुढी उभी करून गुढीची पूजा करावी व पंचांगस्थ श्रीगणपतीचे पूजन करावे. या संवत्सराचे नाव विकारी असे असून या वर्षात पर्जन्यमान सरासरी पेक्षा कमी असणार आहे. त्या विषयी लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. ६ एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या परंपरेप्रमाणे सकाळी सूर्योदयानंतर गुढी (ब्रह्मध्वज) उभी करून तिची पूजा करावी, पंचांगाची पूजा करावी व सायंकाळी सूर्यास्तापूर्वी गुढी परत उतरवून ठेवावी. गुढी पाडवा हा नवीन संकल्प करण्याचा दिवस देखील आहे. पावसाचे कमी होणारे प्रमाण पाहता आपण सर्वांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचा संकल्प करू या !

- मोहन दाते

टॅग्स :gudhi padwaगुढी पाडवाcultureसांस्कृतिकPuneपुणे