शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

गणेशोत्सवासाठी ‘बेस्ट’ सेवा

By admin | Updated: August 16, 2016 01:56 IST

मुंबई शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना विद्युत पुरवठा करणारे बेस्ट प्रशासन अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ यंत्रणेसह गणेशोत्सवासाठी सज्ज झाले आहे.

मुंबई : मुंबई शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना विद्युत पुरवठा करणारे बेस्ट प्रशासन अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ यंत्रणेसह गणेशोत्सवासाठी सज्ज झाले आहे. बेस्टने गणेशोत्सव मंडळांकरिता विद्युत रोशणाईकरिता एक खिडकी योजनेअंतर्गत तात्पुरता वीजपुरवठा देणे, मार्गप्रकाश योजनेद्वारे श्रींच्या विसर्जनावेळी खास प्रकाशयोजना करणे, गणेशोत्सवादरम्यान अत्याधुनिक संपर्क सुविधा कार्यान्वित करणे आणि आॅनलाइन मागणीपत्र नोंदणी करणे; अशी चार स्तरीय योजना आखली आहे.मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, रस्ता अथवा पदपथावर मंडपाची उभारणी करणाऱ्या गणेश मंडळांना वीजजोडणीसाठीचा अर्ज करताना महापालिकेकडून मंडप उभारणीबाबतचे प्राप्त ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक असणार आहे. शिवाय संबंधित पोलीस ठाण्याच्या परवानगीची या वर्षीची अथवा गतवर्षाची प्रत अर्जासोबत जोडणे आणि या वर्षी संबंधित पोलीस ठाण्यात अर्ज केलेल्या पोचपावतीची छायांकित प्रत जोडणे आवश्यक असणार आहे. बेस्टकडून गणेशविसर्जनावेळी विसर्जनाच्या मार्गावर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी अधिक प्रखर प्रकाशयोजना पुरवण्यात येणार आहे. प्रमुख विसर्जन स्थळे आणि कृत्रिम तलाव येथेही मनोरे उभारून प्रकाशयोजना करण्यात येणार आहे. विसर्जनस्थळी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास जीवरक्षकांच्या मदतीकरिता सर्च लाईट बसवण्यात येतील. बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागाचे सिस्टीम व सुपरवाईझरी कंट्रोल २४ तास कार्यरत असून, त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. कर्मचाऱ्यांना विसर्जनस्थळी त्वरित संपर्क साधता यावा म्हणून भ्रमणदूरध्वनी, वॉकीटॉकी दिला जाईल. (प्रतिनिधी)- सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी वीज चोरीच्या मोहात पडू नये. अधिकृतरीत्या बेस्टकडूनच वीज घ्यावी. अनधिकृतरीत्या वीजपुरवठा घेतल्यास अपघात होण्याची भीती आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्यास विभागातील कक्ष आणि दोष निवारण कक्षाशी संपर्क साधावा.