बेनवाझ शरीर घरी तरी तुमचे कोणी ऐकते का ? - सलीम खान

By Admin | Updated: September 21, 2016 09:57 IST2016-09-21T09:27:26+5:302016-09-21T09:57:17+5:30

सलमान खानचे वडिल सलीम खान यांनी उरी दहशतवादी हल्ल्यावरुन पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर अत्यंत बोच-या शब्दात टीका केली आहे.

Benhaz you listen to body at home? - Salim Khan | बेनवाझ शरीर घरी तरी तुमचे कोणी ऐकते का ? - सलीम खान

बेनवाझ शरीर घरी तरी तुमचे कोणी ऐकते का ? - सलीम खान

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. २१ - बॉलिवू़डचे प्रसिद्ध पटकथालेखक आणि सलमान खानचे वडिल सलीम खान यांनी उरी दहशतवादी हल्ल्यावरुन पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर अत्यंत बोच-या शब्दात टीका केली आहे. 
 
पाकिस्तानात कोणी नवाझ शरीफ यांचे ऐकत नाही तर, आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताबद्दलच्या शरीफ यांच्या तक्रारींना कोणी महत्व देईल का  ? असा सवाल सलीम खान यांनी टि्वटरवरुन विचारला आहे. नवाझ शरीफ यांचे नाव बदलून बेनवाझ शरीर असे नवीन नाव त्यांना द्यावे असे सलीम यांनी म्हटले आहे. 
 
ज्यांनी तुमचे नाव नवाझ शरीफ ठेवले त्यांना तुमचे गुण समजले असते तर, त्यांनी आज नाव बदलून तुम्हाला बेनवाझ शरीर असे नवीन नाव दिले असते. पाकिस्तानात कोणी आपले ऐकत नाही अशी शरीफ यांनी स्वत: कबुली दिली आहे. 
लष्कर, संसद तुमचे लोक तुमचं ऐकत नाहीत. तुमच्या कुटुंबातले तरी तुमचे ऐकतात का ? असा सवाल सलीम खान यांनी टिवटरवरुन विचारला आहे. 
 

Web Title: Benhaz you listen to body at home? - Salim Khan