पतीच्या चितेवर दिला जीव !
By Admin | Updated: April 1, 2015 10:12 IST2015-04-01T02:13:43+5:302015-04-01T10:12:21+5:30
हृद्यविकाराने निधन झालेल्या पतीचे अंत्यसंस्कार उरकून सोमवारी पत्नी घरी आली. परंतु मध्यरात्रीपासून अचानक गायब झाली. सकाळी तिचा मृतदेह स्मशानभूमीत पतीच्या

पतीच्या चितेवर दिला जीव !
औसा/किल्लारी (जि. लातूर): हृद्यविकाराने निधन झालेल्या पतीचे अंत्यसंस्कार उरकून सोमवारी पत्नी घरी आली. परंतु मध्यरात्रीपासून अचानक गायब झाली. सकाळी तिचा मृतदेह स्मशानभूमीत पतीच्या अस्थिशेजारी जळलेल्या अवस्थेत आढळून आला. तुकाराम मसाजी माने (५५) आणि उषा माने (४५) अशी मृतांची नावे आहेत. पतीचा विरह सहन न झाल्यानेच तिने चितेवरच स्वत:ची आहुती दिल्याची चर्चा गावात आहे. डिप्रेशनमध्ये असलेली ही महिला चितेशेजारी गेल्यानंतर साडीने पेट घेतला असावा व यातून हे घडले असावे, अशी शक्यता पोलीस अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी व्यक्त केली.
.तुकाराम यांचा अंत्यविधी उरकून नातेवाईकांसह पत्नी उषा याही घरी आल्या. परंतु सकाळी त्या घरातून गायब दिसल्या. अखेर नातेवाईकांना पतीच्याा चितेशेजारी उषा यांचेही प्रेत अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आले. (प्रतिनिधी)