शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
2
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
3
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
4
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
5
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
6
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
7
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
8
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
9
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
10
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
11
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
12
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
13
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
14
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
15
इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
16
Lionel Messi: सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
17
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
18
शोएब मलिकचं तिसरं लग्नही मोडण्याच्या मार्गावर? सना जावेदसोबतच्या नात्यात दुरावा 
19
"आम्ही थांबणार नाही..", दुसऱ्या बाळाच्या जन्माआधीच भारती सिंग करतेय तिसऱ्या बाळाचं प्लानिंग? पती हर्ष म्हणाला...
20
Stock Market Holidays: पुढच्या वर्षी १५ दिवस बंद राहणार शेअर बाजार, पाहा NSE मध्ये सुट्ट्या कधी, पाहा लिस्ट
Daily Top 2Weekly Top 5

Belgaum Municipal Corporation Election Results: बेळगाव महानगरपालिकेत भाजपाला स्पष्ट बहुमत, महाराष्ट्र एकीकरण समितीचा दारुण पराभव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 12:48 IST

Belgaum Municipal Corporation Election Results LIVE Updates: बेळगाव महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच पक्षीय पातळीवर लढवल्या गेलेल्या निवडणुकीमध्ये भाजपाने स्पष्ट बहुमतासह निर्विवाद यश मिळवलं आहे.

ठळक मुद्देळगाव महानगरपालिकेच्या एकूण ५८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपाने ३६ जागांवर विजय मिळवलागेली अनेक वर्षे बेळगावातील मराठी माणसाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीचा या निवडणुकीत दारुण पराभव झालाकाँग्रेसच्या खात्यात ९ जागा गेल्या. महाराष्ट्र एकीकरण समितीला २ जागा मिळाल्या. उर्वरित ११ जागांवर इतर उमेदवार विजयी झाले

बेळगाव - महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच पक्षीय पातळीवर लढवल्या गेलेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपाने स्पष्ट बहुमतासह निर्विवाद यश मिळवलं आहे. (Belgaum Municipal Corporation Election Results) बेळगाव महानगरपालिकेच्या एकूण ५८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपाने ३६ जागांवर विजय मिळवला आहे. तर गेली अनेक वर्षे बेळगावातील मराठी माणसाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला असून, एकीकरण समितीच्या पदरात केवळ दोन जागा पडल्या आहेत. (BJP has a clear majority in Belgaum Municipal Corporation, Maharashtra ekikaran samitee has suffered a crushing defeat)

बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक पहिल्यांदाच पक्षीय पद्धतीने लढवली गेल्याने या निवडणुकीच्या निकालांबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. दरम्यान, कर्नाटकमध्ये सत्तेत असलेल्या भाजपाने बेळगाव महानगरपालिकेच्या निकालांमध्ये वर्चस्व दिसून आले. मतमोजणीमध्ये सुरुवातीपासूनच भाजपाने आघाडी घेतली. अखेर भाजपाने ३६ जागांवर बाजी मारत स्पष्ट बहुमत मिळवले. तर काँग्रेसच्या खात्यात ९ जागा गेल्या. महाराष्ट्र एकीकरण समितीला २ जागा मिळाल्या. उर्वरित ११ जागांवर इतर उमेदवार विजयी झाले.

मतमोजणीदरम्यान  बहुतांश वॉर्डामध्ये भाजपचे उमेदवार निवडून येऊ लागल्यामुळे भाजप क्लीनस्वीप कडे वाटचाल करत असल्याचे दिसून येत होते. यावेळी महानगरपालिका निवडणूक सर्वप्रथम पक्षीय तिकिटावर झाली. महाराष्ट्र एकीकरण समिती विरुद्ध काँग्रेस विरुद्ध भाजप आणि इतर पक्ष अशा पद्धतीने झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांचा धक्कादायकरीत्या पराभव होत असल्याचे दिसून येत आहे. ज्यांच्या विजयाची शक्यता शंभर टक्के होती असे मराठी आणि समितीचे उमेदवार निवडणुकीत एका मागोमाग एक पराभूत होत असल्यामुळे भाजपची एकहाती विजयाकडे वाटचाल नक्की झाली. 

बेळगाव महानगरपालिकेवर कोणाची सत्ता येणार हा प्रश्न अनेक दिवसांपासून सतावत होता, अनेक जाणकारांनी तज्ञांनी या वेळी कोणालाही एक हाती सत्ता करता येणार नाही. असे भवितव्य व्यक्त केले होते. मात्र भाजपची वाटचाल जोरदार सुरू झाल्याने आणि सर्वच उमेदवारांनी जास्तीत जास्त विजयाकडे वाटचाल केल्याने निवडणुकीचा निकाल भाजपच्या बाजूने लागत आहे.

टॅग्स :belgaonबेळगावElectionनिवडणूकBJPभाजपाmaharashtra ekikaran samiteeमहाराष्ट्र एकीकरण समितीcongressकाँग्रेस