शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
3
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
4
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
5
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
6
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
7
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
8
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
9
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
10
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
11
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
12
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
13
‘सैयारा’- एक अख्खी पिढी इतकी पागल का झाली आहे?
14
समलिंगी मातेच्या जोडीदारालाही ‘पितृत्व रजा’!
15
‘सहकारा’चा मंत्र गावागावांत पोहोचावा म्हणून..राष्ट्रीय सहकार धोरण २०२५, एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य
16
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
17
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
19
अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा मुंबईकरांना भुर्दंड का?  मुंबई महानगरपालिकेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे
20
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  

धनंजय मुंडे अजित पवारांना १० मिनिटे भेटले अन् परळीला रवाना झाले; काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 20:25 IST

बीड प्रकरणात जे म्हणणं आहे त्याबाबत भूमिका मांडू असं धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे. 

मुंबई - बीड हत्याकांड आणि खंडणी प्रकरणावरून राज्यातील वातावरण तापलं आहे. आज वाल्मिक कराडला कोर्टात हजर करण्यात आले त्यावेळी त्याच्यावर मकोका लावण्यात आला आहे. कराडला एसआयटीच्या ताब्यात देण्यात आले. त्यामुळे परळीत वातावरण बिघडलं आहे. वाल्मिक कराड समर्थकांनी आत्मदहनाचाही प्रयत्न केला. याच घडामोडीत मुंबईत मंत्री धनंजय मुंडे यांनी देवगिरी निवासस्थानी जात उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीला विशेष महत्त्व होते परंतु अवघ्या १० मिनिटांत ही बैठक संपवून धनंजय मुंडे परळीच्या दिशेने रवाना झाले. परळीतील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेता धनंजय मुंडे यांनी परळीला जाण्याचा निर्णय घेतला आहे. परळीत सध्या मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. बीड शहर पोलीस स्टेशनबाहेर सकाळपासून मोठ्या संख्येने कराड समर्थक जमले होते. वाल्मिक कराडची आई आणि पत्नीसह इतर महिला ठिय्या आंदोलनासाठी बसल्या होत्या. वाल्मिक कराडवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी करत समर्थकांनी परळी बंदचीही हाक दिली होती. त्यात कराड समर्थकांमधील २ तरुणांनी अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला परंतु त्यांना वेळीच रोखल्याने अनर्थ टळला.

परळीत कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आणि तणाव निर्माण झाला असून त्याच बाबतीत धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची भेट घेऊन माहिती दिली. अजित पवारांना परळीतील स्थितीचा आढावा देऊन धनंजय मुंडे परळीच्या दिशेने रवाना झालेत. पुढील २ दिवसांनी परळीतील परिस्थिती शांत झाल्यानंतरच माध्यमांशी संवाद साधला जाईल. बीड प्रकरणात जे म्हणणं आहे त्याबाबत भूमिका मांडू असं धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे. 

आज दिवसभरात काय घडलं?

मस्साजोग येथील आवादा ऍनर्जी कंपनीच्या अधिकाऱ्यांना २ कोटी रुपयाची खंडणी मागून त्यांना जीवे मारण्याच्या दिलेल्या धमकी प्रकरणी वाल्मिक कराड १५ दिवस पोलीस कोठडीत होता. आज मंगळवारी दुपारी केज येथील न्यायालयात हजर केले असता, दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश दिशांत गोळे यांनी त्याला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली.  न्यायालयीन कोठडी मिळताच वाल्मिक कराडला मकोका लागल्यामुळे पुढील तपास करण्यासाठी त्याला आमच्या ताब्यात देण्यात यावे. असा अर्ज 'एसआयटी'च्या अधिकाऱ्यांनी केला. यातच परळीत वाल्मिक कराड समर्थकांनी बीड शहर पोलीस ठाण्याबाहेर जमून घोषणाबाजी केली. काही समर्थकांनी आत्मदहनाचाही प्रयत्न केला. 

टॅग्स :walmik karadवाल्मीक कराडDhananjay Mundeधनंजय मुंडेbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणAjit Pawarअजित पवार