शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
3
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
4
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
5
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
6
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
7
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
8
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
9
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
10
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
11
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
12
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
13
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
14
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
15
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
16
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
17
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
18
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
19
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
20
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

"हे माझ्यासाठी किती कठीण आहे कळतंय का?"; कार्यकर्त्याने स्वतःला संपवल्याने पंकजा मुंडे भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2024 17:03 IST

Beed : पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर त्यांच्या एका समर्थकाने आपली जीवनयात्रा संपवली आहे.

Pankaja Munde :  बीड लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे या शरद पवार गटाच्या बजरंग सोनावणे यांच्याकडून पराभूत झाल्या आहेत. पंकजा मुंडे यांच्यामुळे सुरुवातीपासून बीड जिल्ह्यातील निवडणूक ही एकतर्फी होणार असल्याची चर्चा होती. मात्र शरद पवारांनी बीडसाठी बजरंग सोनावणे यांना उमेदवारी दिल्याने ही निवडणूक अटीतटीची झाली होती. शेवटी संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या बीड मतदारसंघात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. हा पराभव पंकजा मुंडे यांच्यासह त्यांच्या चाहत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्याही जिव्हारी लागला आहे. याच पराभवातून एकाने आत्महत्या केल्याने पंकजा मुंडे यांनी आता कार्यकर्त्यांना विनंती केली आहे.

पंकजा मुंडे यांचा पराभव जिव्हारी लागल्याने अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळअंबा येथील ऊसतोड कामगार युवक पांडुरंग रामभाऊ सोनवणे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पांडुरंग सोनवणे यांनी रविवारी सकाळी शेतात जाऊन गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. धक्कादायक बाब म्हणजे निकालाच्या दिवशीच पांडुरंग हे आत्महत्या करायला गेले होते. मात्र त्यांना अडवण्यात आल्याने त्यांनी पाचच दिवसात आपले जीवन संपवले. या घटनेनंतर पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत शांत आणि सकारात्मक राहण्याचा सल्ला दिला आहे.

"स्वतः च्या जीवाला धक्का तोच लावेल ज्याला माझ्यावर प्रेम किंवा श्रद्धा नाही. मी लढत आहे संयम ठेवत आहे तुम्हीही सकारात्मकता दाखवा आणि संयमाने रहा. कोणी माझ्यासाठी जीव देणे कळतेय का किती कठीण आहे माझ्यासाठी??मला प्रचंड अपराधी आणि दुःखी वाटत आहे. मी स्वीकारला आणि पचवला आहे पराभव तुम्ही ही पचवा!! अंधारी रात्री नंतर सुंदर प्रकाश असतो तुम्ही माझ्या जीवनातील प्रकाश आहात. शांत व सकारात्मक रहा," असे पंकजा मुंडे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

बीड लोकसभा मतदार संघातील पराभव झाल्याने अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळअंबा येथील उसतोड कामगार पांडुरंग सोनवणे शेतात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. पांडुरंग सोनवणे  हे भाजप आणि पंकजा मुंडे यांचा कट्टर समर्थक होते. त्यांच्या मागे कुटुंबात आई, वडील, पत्नी व एक मुलगी  व लहान मुलगा आहे.

दरम्यान, मुंडेच्या पराभवाची घोषणा झाल्यानंतर पांडुरंग सोनवणे हे दुःखी झाले होते आणि त्यांनी आत्महत्या करणार असे बोलून दाखवले होते. मात्र त्यावेळी सरपंच आणि गावकऱ्यांनी त्यांची समजूत काढली आणि त्यांना आत्महत्येचा विचार मनातून काढून टाक असे सांगितले. मात्र त्यानंतर पाच दिवसांनी सोनवणे यांनी टोकाचे पाऊल उचलले. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Pankaja Mundeपंकजा मुंडेBeedबीडBJPभाजपा