शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

बूटचोरीच्या राड्यानंतर 'त्या' मुलीला दोनच दिवसात मिळाला दुसरा साथीदार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2018 10:56 AM

अवघ्या दोनच दिवसात तिला नवा जोडीदार मिळाला.

बीड- लग्नात बूटचोरीवरुन झालेल्या राड्यानंतर लग्न मोडलेल्या मुलीला नवा जोडीदार मिळाला आहे. बीडच्या अंबाजोगाईतील तरुणाशी वधूचं लग्न झालं असून निकाह मोडल्यानंतर अवघ्या दोनच दिवसात तिला नवा जोडीदार मिळाला.आंबाजोगाईमधील सायगावमध्ये राहणाऱ्या युवकाशी तरुणीचं लग्न झालं. 

नेमंक प्रकरण काय?लग्नात मुलीकडच्यांनी नवरदेवाचे बूट लपवून त्याच्याकडून पैसे घ्यायचे ही पद्धत आपल्याकडे आहे. परंतु याच बूट लपवण्यावरुन झालेल्या वादात चक्क नवरदेवाचेच डोके फुटल्याची घटना आहे. बीडच्या केज तालुक्यातील कुंभेफळ गावात रविवारी हा धक्कादायक प्रकार घडला.  महत्त्वाचे म्हणजे सासऱ्याने झालेले लग्न मोडून मुलीला तलाक घ्यायला लावला आहे.

सुलताना युनूस शेखचा नबी सिकंदर शेख यांच्या मुलीशी निकाह होता. पण लग्नाआधी मुलीच्या भावाने नवरदेवाचे बूट लपवल्याने वाद झाला आणि त्याचे रुपांतर मारहाणीत झाले.  मात्र, सामोपचाराने हा वाद मिटला, लग्नही झाले. पण लग्नाआधी घडलेल्या प्रकारावरुन पुन्हा वादाला सुरुवात झाली. या हाणामारीत नवरदेवाचे डोकं फुटले आणि त्याला सहा टाके पडले.  सासऱ्यानेच आपल्या हातातील लाकडाने नवरदेवावर वार केल्याचा आरोप आहे.

सुलतानवर केजच्या सरकारी रुग्णालयात उपचार केल्यावर, नवरदेवाची मंडळी युसूफ वडगाव पोलिस स्टेशनला गेली.  पोलिस स्थानकात बराच काळ तणाव निर्माण झाल्यानंतर पोलीस दाखल झाले. मात्र शेवटी हा वाद तलाक होऊन संपला.