एका महिलेमुळे अख्खे गाव झाले क्वॉरंटाईन,गावकऱ्यांना भरली कोरोनाची धडकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 18:12 IST2020-05-28T18:09:36+5:302020-05-28T18:12:42+5:30
मलायका ही चोखदंड आहे. ती जे काही करते त्यात काही ना काही खासियत असतेच. तिचा व्हायरल झालेल्या व्हिडीओत याची प्रचिती येईल.

एका महिलेमुळे अख्खे गाव झाले क्वॉरंटाईन,गावकऱ्यांना भरली कोरोनाची धडकी
आपली एका चूक इतरांना किती महागात पडू शकते, याचा कोणीच विचार करताना दिसत नाही. घरात राहा सुरक्षित राहा हे सांगून सांगून त्याचा पार भुगा पडला आहे. तरीही कोणीही ऐकायला तयार नाही. स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी तरी घरात बसा ही मानसिकताच उरलेली नाही. संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू असूनही लोकं घराबाहेर पडत आहेत. सोशल डिस्टंसिंगचा फार फज्जा उडत आहेत. अशात संक्रमण आटोक्यात आणणे तर सोडाच त्याचे संक्रमण होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात स्थलांतरामुळेदेखील कोरोनाच्या भीतीने गावक-यांना धडकी भरवली आहे. अशात गेल्या कित्येक दिवसांपासून पुणे, मुंबईतून गावाकडे येणाऱ्या नागरिकांमुळे ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे.
शिर्डी शेजारच्या निमगाव येथील भाजी विक्रेती महिला कोरोनाबाधित झाल्याने आख्ख गाव आता पुढील चौदा दिवसांसाठी सील करण्यात आलं आहे. या महिलेच्या संपर्कात आलेल्या डॉक्टरसह 29 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. सगळ्या रुग्णाचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. आता, अहवाल नेमका काय येतो, याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे.
देशातील कोरोना संक्रमितांची संख्या 1 लाख 57 हजार 445 झाली आहे. संक्रमितांची संख्या वाढण्यासोबत चाचण्यांची संख्याही वाढली आहे.