शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

विसंवादामुळेच उसवते नात्यांची वीण..!

By admin | Updated: March 11, 2016 02:02 IST

घर जोडून ठेवण्याचे काम करते ती एक ‘स्त्री’... चूल-मूलच्या चौकटीतून स्वत:च्या कर्तृत्वाचे अवकाश व्यापण्यासाठी ’ती’ बाहेर पडली... विचारांनीही स्वतंत्र झाली... पण नात्यांपासून दुरावली.

नम्रता फडणीस/सायली जोशी-पटवर्धन,  पुणेघर जोडून ठेवण्याचे काम करते ती एक ‘स्त्री’... चूल-मूलच्या चौकटीतून स्वत:च्या कर्तृत्वाचे अवकाश व्यापण्यासाठी ’ती’ बाहेर पडली... विचारांनीही स्वतंत्र झाली... पण नात्यांपासून दुरावली. संसाराची दोन चाके असणाऱ्या पती-पत्नी दोघांचीही नाते टिकविणे ही जबाबदारी. संवादातून सुंदर नात्याला बहरत ठेवून वाटचाल करणे हे वैवाहिक जीवनाचे फलित असले पाहिजे, नेमकी हीच गोष्ट दोघांच्या नात्यातून हद्दपार झाली आहे. विसंवाद, अवास्तव अपेक्षा, नात्याकडे गांभीर्याने न बघणे, छोट्या छोट्या कारणासांठी विभक्त होण्याचा विचार करणे अशा गोष्टींंमुळे विवाहपद्धतीलाच तडा जात असल्याचे दिसून आले आहे. अनेक जोडपी आपल्या मुलांचाही विचार न करता नात्यांची वीण तोडून विभक्त होण्याचा मार्ग निवडत असल्याची धक्कादायक बाब ‘लोकमत’ पाहणीतून समोर आली आहे.पोलीस आयुक्तालयामध्ये गुरुवारी आणि शुक्रवारी महिला सहायक कक्षात समुपदेशनाचा तास भरतो. जोडपी तक्रारी घेऊन या ठिकाणी येतात. नात्यांमध्ये दुरावा का येतो? नातं तुटण्याला नेमक्या कोणत्या गोष्टी कारणीभूत असतात? याचा शोध घेण्यासाठी ‘लोकमत’ने थेट या ठिकाणी भेट देऊन नात्यांची ही गुंतागुंत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यात आपल्या नात्यांची विस्कटलेली घडी पूर्वपदावर आणण्यासाठी काहीशी धडपड होतानाही दिसलीही; त्यांच्याशी संवाद साधून जोडप्यांच्या आयुष्याला सकारात्मक दिशा देण्याचे काम कोणताही मोबदला न घेता अ‍ॅड. जयश्री तुंगार, लीना पाटील, शुभांगी कदम, पौर्णिमा चव्हाण, रश्मी जोशी, अनुजा जोशी आणि अ‍ॅड. मधुमिता सुखात्मे करीत आहेत. पुरुषही रडतात...पुरुष सहसा कुणासमोर रडत नाहीत; पण महिलांचे अत्याचार सहन न झाल्याने पुरुषही समुपदेशकांसमोर रडून मन मोकळे करतात. महिला सहायता कक्ष महिलांनाच सपोर्ट करतो, अशी चुकीची समजूत महिलांमध्ये असल्याने महिला पुरुषांविषयीच्या खोट्या तक्रारींचा पाढा वाचतात... मात्र, पुरुषांमध्ये विश्वास निर्माण करून त्यांना बोलते करण्याचे कौशल्य या महिला समुपदेशकांकडे असल्याने त्यांनाही न्याय मिळतो. प्रसंग १लग्नाला ३५ वर्षे झाली... पत्नीचा जॉब सकाळी ९.३0 ते १.३0 आणि पतीचा १२ ते ६. दोघांना एकमेकांबरोबर वेळ घालवायला खूप कमी अवधी मिळतो. असे असूनही मिळालेले क्षण एकत्र घालविण्याऐवजी भांडण.. कुरबुरी.. यामध्येच त्यांचे आयुष्य चालले आहे... इतकी वर्षे एकमेकांच्या सहवासात राहूनही दोघांचा एकमेकांवर विश्वास नाही. पत्नीच्या बडबडण्याला तो कंटाळला आहे... आणि तोही छोट्या छोट्या गोष्टी काढून याच्याशी का बोलते, इकडे का जाते यावरून तिच्याशी वाद घालतो... दोघंही या वयात एकमेकांसाठी किती बदलू शकतात, याचे उत्तर मात्र दोघंही द्यायला तयार नाहीत. प्रसंग २दोघांचं लव्हमॅरेज...पण त्याने जात लपवली...सांगितले नाही.. आठ वर्षांच्या संसारवेलीवर दोन फुले उमलली...त्यांचीही पर्वा न करता तो काम करत नाही... दारू पिऊन मारहाण करतो.. खुनाची धमकी देतो.. अशी तिची तक्रार.. तर आमच्या संसारात तिच्या घरच्यांचा अवास्तव हस्पक्षेप... संवाद दोघातही नाही... हा प्रश्न सामंजस्याने सुटणारा असूनही त्यांना एकमेकांशी बोलायचेच नाही...प्रसंग ३त्याच्या आईवडिलांचा अवास्तव हस्तक्षेप म्हणून दोघांना वेगळे घर करून दिले...तरी ती नवऱ्याबरोबर व्यवस्थित राहायला तयार नाही... सासू-सासऱ्यांकडून मानसिक छळ केला जातो.. त्यांच्याशी सहा महिने त्याच्या आईवडिलांचा संपर्कदेखील नाही.. मानसिक अत्याचार काय होतात, हेदेखील सांगता येत नाहीत... घरच्यांच्या सांगण्यावरून ती त्याच्याविरूद्ध तक्रार दाखल करते... ३ महिन्यांच्या तान्हुल्याचा देखील विचार दोघांच्या ठायी नाही. प्रसंग ४ तिचे वय अवघे १९... तिला लग्न करण्याची अजिबात इच्छा नसताना घरच्यांच्या दबावामुळे ते झाले... मात्र आता शिक्षण पूर्ण करून स्वत:च्या पायांवर उभे राहण्याची स्वप्ने बघत असताना तिला आपला नवराच नको आहे... तिच्यासाठी तो वाटेल ते करायला तयार असताना हिला मात्र या नात्याचे किंवा आपल्यामुळे समोरच्या व्यक्तीचे आयुष्य उद्ध्वस्त होत असल्याचे गांभीर्यच नाही... त्यात तिच्या घरच्यांनाच या सगळ्या गोष्टींचे विशेष गांभीर्य नसल्याने मुलगा मात्र परिस्थितीत भरडला गेला...प्रसंग ५बायकोला ताडी पिण्याचे असलेले व्यसन... आणि त्यापासून तिला दूर करताना नवऱ्याचा लागलेला कस... यावरून त्याने तिला काही बोलले तर तडक माहेरी निघून जाणारी ती आणि या सगळ्यात त्यांच्या लहानग्यांची होत असलेली फरफट... समजूतदारपणा न दाखवता दोघांचाही असलेला आडमुठेपणा आणि त्यावरून घटस्फोटाचा झालेला निर्णय त्या दोघांना, त्यांच्या चिमुरड्यांना आणि दोन्ही कुटुंबातील लोकांना मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रासाचाच.सध्याच्या धावपळीच्या जगात पती-पत्नी नात्यामधील वाढलेला विसंवाद आणि त्याच्याकडे पाहण्याचा दोघांचाही दृष्टिकोन नात्यातील गुंतागुंत वाढण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. संसाराचा कणा म्हटल्या जाणाऱ्या स्त्रीनेच जर समंजसपणा न दाखविण्याचे ठरविल्यास भारतीय संस्कृतीत मानाची मानली जाणारी कुटुंबव्यवस्था येत्या काळात आणखी धोक्यात येईल. - प्रतिभा जोशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महिला साहाय्य कक्षसमुपदेशकांनी काढलेले प्रातिनिधिक निष्कर्ष आर्थिकदृष्ट्या सबळ जोडप्यांमध्ये आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही, असा दृष्टिकोन अनेकदा पाहायला मिळत आहे. मुलगी घराबाहेर पडली तरीही मुले मात्र अजून घरात आली नाहीत. मुलींनी घर आणि बाहेरच्या जबाबदाऱ्या सांभाळत स्वत:मध्ये बदल घडवले; मात्र मुलांची पुरुषप्रधान असलेली मानसिकता आजही तशीच आहे. त्यामुळे नातेसंबंधात अडचणी निर्माण होतात.जीवनातील प्रत्येक गोष्टीकडे टेम्पररी म्हणून पाहण्याची सवय नात्यांमध्ये दुरावा येण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. यासाठी लहान-मोठ्या बाबतीत इगो न ठेवता सामंजस्याने त्यावर मार्ग काढणे केव्हाही श्रेयस्कर, असा पर्याय समुपदेशक या जोडप्यांना देताना दिसतात. पुढील परिणामांचा विचार केला जात नाही आणि तडकाफडकी निर्णय घेतले जातात. त्यामुळे दोन आयुष्य तर उद्ध्वस्त होतातच; मात्र अपत्यांनाही या सर्व परिस्थितीला सामोरे जावे लागते आणि त्यामध्ये या लहानग्यांची पुरती ओढाताण होते. पालक होताना पालकत्वाची योग्य ती जाण नसल्याने लग्न करत असताना मुला-मुलींना घरातून योग्य ते मार्गदर्शन मिळत नसल्याचेही समुपदेशकांचे म्हणणे होते. त्यामुळे लग्न झाल्यावर नाती, नवीन कुटुंब, शारीरिक-मानसिक ओढाताण यांतील समतोल कसा साधायचा, हेच माहीत नसल्याने लग्नानंतरच्या अडचणींत वाढच होताना दिसते. मुलींना लग्नाआधी जास्त लाडात वाढविणे आणि त्यांना अतिसंरक्षित करणे, हे लग्न झाल्यानंतरच्या नात्यात बाधा आणणारे प्रमुख मुद्दे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याबरोबरच मुलीच्या संसारात असलेला अतिहस्तक्षेप हेही नवीन नाते फुलण्याला धोकादायक ठरत आहे. अनेक वेळा ४९८ अ कलमाचा गैरवापर केला जातो... नवऱ्याला अडकविण्यासाठी त्या वाट्टेल ते सांगतात. अशा वेळी तटस्थ भूमिकेमधूनच पाहावे लागते.