शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

अर्धचंद्रकार छत, खजुरांच्या झाडांमुळे सोलापूर रेल्वे स्थानकाचे सौंदर्य खुलले

By appasaheb.patil | Updated: May 8, 2019 13:29 IST

रेल्वे मंत्रालयाच्या आराखड्यातून झाली कामे; जम्पिंग ग्रास, इलेक्ट्रॉनिक ट्रेन डिस्प्ले ठरतेय प्रवाशांना आकर्षक

ठळक मुद्देसोलापुरातील पर्यटनस्थळांचे रेल्वे स्थानकावर ब्रँडिंगदिव्यांगांसाठी रॅम्प तर अपंगांसाठी लिफ्टवाहतूक कोंडी मागील दोन ते तीन महिन्यांपासून संपुष्टात आली रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनीही टिष्ट्वट करून कामाचे कौतुक केले

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : सोलापूररेल्वे स्थानकासमोरील पोर्चमध्ये अर्धचंद्रकार छताची उभारणी..क़ोरियन कार्पेट लॉन...रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा़ख़जुराची झाडे..जागोजागी असलेले प्रकाशमय दिवे..इंजिनाची बदलण्यात आलेली दिशा..जंपिंग ग्रास (हिरवे गवत).. उंच झाडे..अन् रात्रीच्या वेळी स्थानकावर करण्यात आलेली विद्युत रोषणाई..इलेक्ट्रॉनिक ट्रेन डिस्प्ले फलक..दिव्यांगांसाठी रॅम्प..लिफ्ट आदी झालेले सोलापूर रेल्वे स्थानकावरील बदल हे प्रवाशांच्या नजरेत भरत आहेत. स्थानकांच्या भिंतीवर चित्रकलेच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचे ब्रँडिंग करण्यात आले असून, ते प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या वतीने २०१८ साली सोलापूर रेल्वे स्थानकाचा समावेश स्थानक पुनर्विकासाच्या यादीत समाविष्ट करण्यात आला होता़ यासाठी सोलापूर मंडलाकडून त्याबाबतचा प्रस्ताव व करावयाची कामे याचा आराखडा मागविण्यात आला होता़ या आराखड्यानुसार रेल्वे मंत्रालयाने मंजुरी देत पाच ते सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला़ सुरुवातीला संथगतीने सुरू असलेल्या कामाने जुलै महिन्यात गती घेतली अन् मार्च महिन्यात पूर्ण करण्यात आले़ अजूनही स्थानक परिसरात किरकोळ कामे सुरू असल्याचे ‘लोकमत’ पाहणीत आढळून आले़ अवघ्या सहा ते सात महिन्यांत सोलापूर रेल्वेस्थानक व परिसरात विविध विकासकामे करण्यात आली़ या कामांमुळे सोलापूर रेल्वेस्थानकाचा चेहरामोहरा बदलला़ यामुळे रेल्वेस्थानक परिसरात येणाºया सर्व प्रवाशांचे हे आकर्षण ठरत आहे़ या विकासकामांचे फोटो पाहून रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनीही टिष्ट्वट करून कामाचे कौतुक केले होते.

दिव्यांगांसाठी रॅम्प तर अपंगांसाठी लिफ्टप्रवाशांना केंद्रबिंदू मानून रेल्वे मंत्रालयाच्या सूचनेनुसार सोलापूर स्थानकावर दिव्यांग प्रवाशांसाठी रॅम्प तर अपंग व्यक्तींसाठी लिफ्टची सोय करण्यात आली आहे़ स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिव्यांगांसाठी दोन रॅम्पची उभारणी करण्यात आली आहे़ याशिवाय अपंग व्यक्तींसाठी दोन ते तीन लिफ्ट सुरू करण्यात आले आहेत़ या सेवा-सुविधांमुळे प्रवाशांकडून समाधान व्यक्त होत आहे़

वाहतूक कोंडी संपुष्टात...सोलापूर रेल्वे स्थानकाच्या वतीने करण्यात आलेल्या विविध विकासकामांत स्थानक परिसरात प्रत्येक वाहनासाठी वेगळा रस्ता तयार करण्यात आला आहे. चारचाकी वाहनांसाठी वेगळा रस्ता, दुचाकीस्वारांसाठी वेगळा रस्ता तर पायी चालत जाणाºयांसाठी फुटपाथ बनविण्यात आले आहे़ याशिवाय स्थानक परिसरातील चारचाकी वाहनतळ हलविण्यात आल्याने या परिसरात सातत्याने होणारी वाहतूक कोंडी मागील दोन ते तीन महिन्यांपासून संपुष्टात आली आहे़ 

अजूनही कामे सुरूचरेल्वे मंत्रालयाच्या वतीने पुनर्विकास आराखड्यानुसार करण्यात येणारी कामे अद्यापही रेल्वे स्थानकावर सुरूच असल्याचे पाहावयास मिळाले़ स्थानकावरील तिकीट घरात ‘पीओपी’चे काम अंतिम टप्प्यात आले आहे़ याशिवाय स्थानक परिसरात रंगरंगोटीचे कामही सुरू आहे़ 

सोलापुरातील पर्यटनस्थळांचे रेल्वे स्थानकावर ब्रँडिंग

  • - सोलापूर रेल्वे स्थानकातील मुख्य प्रवेशद्वारातून प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर जाण्या-येण्याच्या मार्गावरील प्रवेशद्वाराजवळील भिंतीवर काही चित्रे काढण्यात आली आहेत.
  • - यात प्रामुख्याने सोलापूरमधील धार्मिक पर्यटनस्थळांचे ब्रँडिंग व्हावे यासाठी सोलापूरच्या सिध्देश्वर यात्रेतील नंदीध्वज, पालखी मिरवणूक, नंदीध्वजधारक तर पंढरपूरच्या वारीत सहभागी झालेले वारकरी, पालखी सोहळ्यांचे रेखाचित्रे काढण्यात आली आहेत़ 
  • - याशिवाय वस्त्रोद्योग, सूतगिरण्या, उद्योगधंदे, कापड निर्मिती, आधुनिक शेती आदींचे ब्रँडिंग व्हावे, यासाठी रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वार परिसरात जेथे सर्वांच्या नजरेस पडतील अशा ठिकाणी चित्रे काढण्यात आली आहेत़ 

सरकता जिना पाडतोय प्रवाशांना भुरळ- सोलापूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर सुसज्ज असा इलेक्ट्रॉनिक पध्दतीचा सरकता जिना उभा करण्यात आला आहे़ या जिन्याचा वापर प्रामुख्याने बाहेरील राज्यांतून आलेले प्रवासी करीत असल्याचे ‘लोकमत’ च्या पाहणीत आढळून आले़ या जिना परिसरात कोणत्याही प्रवाशाला अडचण येऊ नये अथवा प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी कर्मचाºयाची नियुक्ती करण्यात आली आहे़ दररोज हजारो प्रवासी या जिन्याचा वापर करीत असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले़

लक्ष वेधून घेणारे फलक- स्थानकावर येणाºया प्रवाशांना कोणते कार्यालय कुठे आहे..क़ोणती गाडी कधी येणार आहे...केव्हा सुटणार आहे यासह आदी दिशा व माहिती सांगणारे फलक स्थानकावरील प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहेत़ पुनर्विकास योजनेच्या माध्यमातून स्थानकावर नवीन इलेक्ट्रिक ट्रेन डिस्प्ले, प्लॅटफॉर्मवर नवीन दिशादर्शक फलक बसविण्यात आले आहेत़ शिवाय रात्रीच्या वेळी प्रकाशमय दिसणारे फलक सर्वांच्या मनात भरत आहेत़ 

रेल्वे मंत्रालयाच्या स्थानक पुर्नविकास योजनेच्या माध्यमातून आलेल्या निधीतून सोलापूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी विविध सेवासुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत़ प्रवाशांसाठी आणखीन सेवा सुविधा देण्यासाठी मध्य रेल्वे कटीबध्द आहे़- प्रदीप हिरडेवरिष्ठ वाणिज्य प्रबंधक, सोलापूर

रेल्वे प्रशासनाने सांगितल्या प्रमाणे आराखडा तयार करण्यात आला होता़ अवघ्या चार ते सहा महिन्यात हे काम पूर्ण करण्यात आले आहे़ सोलापूर रेल्वे स्थानकास देशाच्या तुलनेत एक वेगळेपण देण्याचा प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणे केला असून तो सार्थ ठरला आहे़- कल्पक शहा,आॅर्किटेक्चर, सोलापूर 

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेpiyush goyalपीयुष गोयल