शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
'AB फॉर्म'चा झोल केला! भाजपच्या बंडखोर उमेदवाराने पक्षालाच गंडवलं, अमित साटमांचे थेट अधिकाऱ्यालाच पत्र
3
ठाण्यात मनसे, उद्धवसेनेचे दोन उमेदवार निवडणुकीतून बाहेर! अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप, कोणाचे अर्ज झाले रद्द? 
4
'हा देश सर्वांचा; धर्म, जात, भाषा आणि प्रदेशाच्या आधारे भेदभाव होऊ नये'- मोहन भागवत
5
शिंदेसेनेला धक्का, पाच उमेदवारी अर्ज बाद; एबी फॉर्मवर खाडाखोड, झेरॉक्स जोडल्याने ठरले अवैध
6
४० वर्षे ठाकरेंचा निष्ठावंत, एबी फॉर्मही घेतला; ऐनवेळी पक्षाला रामराम अन् भाजपातून अर्ज भरला
7
रोममध्ये विजय देवरकोंडा-रश्मिका मंदानाचा रोमान्स, 'त्या' फोटोवरुन चाहत्यांनी ओळखलंच!
8
सिगरेट, पान मसाला, तंबाखू महागणार, नवीन कर आणि सेस लागू होणार; १ फेब्रुवारीपासून किंमत वाढणार? जाणून घ्या
9
आजपासून 'भारत टॅक्सी'ची सुरुवात; स्वस्त प्रवास अन् 'नो सर्ज प्रायसिंग'ने प्रवाशांना मिळणार दिलासा
10
दोन वर्षांत १४ लाख पाकिस्तान्यांनी देश सोडला! कारण काय?
11
१ वर्षासाठी एफडीमध्ये १ लाख रुपये गुंतवून तुम्हाला किती परतावा मिळेल? कोणत्या बँकेत किती रिटर्न, पाहा
12
ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक्
13
दूधात मिसळलं नळाचं पाणी, तेच ठरलं विष; ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू, १० वर्षांनी झालेला मुलगा
14
नवे वर्ष २०२६: आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी या वर्षात करा 'हे' ५ उपाय!
15
मुंबईकरांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत; ‘आप’ने दिली गॅरंटी, जाहीरनामा केला प्रसिद्ध
16
"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक
17
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
18
शिंदेसेनेच्या २, उद्धवसेना, काँग्रेसच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा अर्ज रद्द, ७१९ उमेदवार रिंगणात
19
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
20
विमानाचं तिकीट आता खिशाला परवडणार? विमान इंधनाच्या किमतीत मोठी कपात; पाहा काय आहेत नवीन दर?
Daily Top 2Weekly Top 5

Nitin Gadkari: राजकारण असो किंवा व्यवसाय, त्यामध्ये 'शॉटकट' चालत नाही; नितीन गडकरींचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 14:48 IST

नितीन गडकरी यांनी याआधीदेखील राज्यात सुरु असलेल्या घडामोडींवर भाष्य केलं होतं.

महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आज या सत्तासंघर्षाचा सातवा दिवस आहे. विधान परिषद निवडणूक निकालानंतर सुरू झालेलं बंड अजूनही सुरू असून आता हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आहे. शिवसेनेकडून होत असलेल्या अपात्रतेच्या कारवाई विरोधात शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. याबाबत सुनावणी देखील आता सुरु आहे. 

शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. भाजपा पडद्याआडून बंडखोरांच्या मदतीने सरकार स्थापनेचे प्रयत्न करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र याचदरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक महत्वाचं विधान केलं आहे. 

राजकारण असो किंवा व्यवसाय, त्यामध्ये 'शॉर्ट कट' चालत नाही. लोकांना जास्त दिवस मूर्ख बनवले जाऊ शकत नाही. लोकनंतर अशांना दारात उभेदेखील करीत नाही, असं नितीन गडकरी म्हणाले. केंद्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन संस्थेच्या वतीने सार्वजनिक-खासगी भागीदारीतून रोगरहित लिंबुवर्गीय रोपटे तयार करणे, या विषयावर आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेत नितीन गडकरी बोलत होते. सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता नितीन गडकरींचं हे विधान महत्वाचं असल्याचं दिसून येत आहे. 

नितीन गडकरी यांनी याआधीदेखील राज्यात सुरु असलेल्या घडामोडींवर भाष्य केलं होतं. महाराष्ट्र सरकारवर आलेल्या संकटामागे भाजप आहे? यावर गडकरी म्हणाले, मी महाराष्ट्रातील राजकारणावर अधिक भाष्य करणार नाही. मात्र, मी एवढे नक्की सांगेन, की जर शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र आले, तर माझ्यासारख्या व्यक्तीला नक्कीच आनंद होईल, असं नितीन गडकरी म्हणाले होते. 

दरम्यान, बंडखोर आमदारांवर होत असलेल्या अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. तसेच अजय चौधरींच्या गटनेते पदाला शिंदे गटाचा आक्षेप असल्याची याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात दोन वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. यावर सध्या सुनावणी सुरु आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार