शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

‘लिव्ह इन’मध्ये सावधगिरी बाळगा! वसईमधील साहित्यिकांचे म्हणणे; घटनेवर व्यक्त केला तीव्र शब्दात संताप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2022 09:28 IST

ते म्हणाले की, ज्या मुली पालकांना आव्हान देऊन निघून जातात, त्यांच्याबाबतीत पालकांना दोष देता येत नाही. श्रद्धाचे पालक तिला थांबवायला गेले होते. मात्र, ती त्या तरुणाच्या प्रेमात वेडी झालेली असल्याने तिने पालकांचे घर सोडले होते.

जगदीश भोवड -

वसई : वसईतील तरुणी श्रद्धा वालकर हिच्याबाबतीत घडलेली घटना ही अमानुष कृत्यात समावेश करावा अशीच असल्याचे मत वसईतील साहित्य वर्तुळात व्यक्त होत आहे. अशा गोष्टी व्हायला लागल्या तर ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या तरुणींच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होईल, असे मत वसईतील मराठी ख्रिस्ती साहित्य मंडळाचे अध्यक्ष रेमंड मचाडो यांनी व्यक्त केले.

ते म्हणाले की, ज्या मुली पालकांना आव्हान देऊन निघून जातात, त्यांच्याबाबतीत पालकांना दोष देता येत नाही. श्रद्धाचे पालक तिला थांबवायला गेले होते. मात्र, ती त्या तरुणाच्या प्रेमात वेडी झालेली असल्याने तिने पालकांचे घर सोडले होते. मात्र, श्रद्धाच्या बाबतीत घडलेल्या घटनेनंतर समाज खडबडून जागा झाला आहे. एवढ्या अमानुषपणे आजवर वसईत तरी घटना घडलेली नव्हती. दुसरीकडे अशा घटनांतून धार्मिक तेढ निर्माण होईल, असे काही घडू नये.

माणुसकीला काळिमा कोकण मराठी साहित्य परिषदेचे पालघर जिल्हा अध्यक्ष प्रवीण दवणे म्हणाले की, ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. सुशिक्षित आणि वयात आलेल्या मुलींनी आपला मित्र-प्रियकर निवडताना त्याचे विचार, त्याचे आचार, त्याची घरची स्थिती पाहून निर्णय घेणे आवश्यक आहे.

घरातून फारकत घेणे चुकीचे -डिंपल प्रकाशनचे प्रकाशक अशोक मुळे म्हणाले की, ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मधील श्रद्धा वालकरचा हा प्रकार धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासणारा आहे. इतके अमानुष असे कुणीच वागू शकत नाही, वागूही नये. सध्या  तरुण-तरुणी स्वतंत्र विचारांचे असतात. स्व-कर्तृत्वाचा एक वेगळाच उन्माद त्यात जाणवतो. पण मैत्री करताना, प्रेमात असताना हे भान विसरून घरातून फारकत घेणे चुकीचे आहे. ते नाते टिकले असते तर... हा जर-तरचा प्रश्न असला तरी कुठेतरी संवाद साधायला हवा होता. असे कृत्य करणाऱ्या या कूकर्म्यास तातडीने फाशी द्यायला हवी.

‘श्रद्धा स्वत:बाबत निर्णय घेऊ शकली नाही’ -ग्रंथप्रेमी प्रकाश जाधव म्हणाले की, श्रद्धाच्या बाबतीत घडलेली घटना पुन्हा घडता कामा नये यासाठी संस्कार जपणे आवश्यक आहे. लहानपणापासूनच मुलांवर चांगले संस्कार होणे आवश्यक आहे. नवीन पिढीला संस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्यायला आवडत नाही. त्यामुळे त्यांचे प्रबोधन होत नाही. रूढी, परंपरा जपल्या पाहिजेत. आंतरजातीय विवाह करण्यास विरोध असण्याचे कारण नाही, पण विचार करून असे विवाह व्हायला हवेत. दोन वर्षे श्रद्धा त्याच्याबरोबर राहत होती. ती शिकलेली होती. तरीही तिला स्वत:बाबत निर्णय घेता आला नाही, हे दुर्दैव आहे.

टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरCrime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरारPoliceपोलिस