शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणाची लढाई सर्वोच्च न्यायालयातही जिंकूच - अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 02:07 IST

Maratha reservation : साष्टपिंपळगाव येथे आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे आंदोलन गेल्या २७ दिवसांपासून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी मंगळवारी या आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

शहागड (जि. जालना) : मराठा समाजाच्या आरक्षणासाठीची लढाई ही आता रस्त्यावरील लढाई राहिली नसून, ती आता सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. तेथेदेखील आपण मराठा समाजाची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी निष्णात आणि ज्येष्ठ विधिज्ञांची नियुक्ती केली आहे. सरकार मराठा समाजाच्या हितासाठी कटिबद्ध असून, विराेधक या मुद्द्याचे राजकारण करून त्यांची पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत; परंतु समाजाने त्याकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी साष्टपिंपळगाव येथे बोलताना केले.साष्टपिंपळगाव येथे आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे आंदोलन गेल्या २७ दिवसांपासून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी मंगळवारी या आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.अनेक राज्यांतील आरक्षण हे ५० टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे, त्यांना स्थगिती दिली नाही. परंतु मराठा समाजाचा मुद्दा आल्यावरच स्थगिती का दिली हे समजू शकणारे नसल्याचेही चव्हाण म्हणाले. यासाठी त्यांनी हरियाणा, तामिळनाडू या राज्यांचे उदाहरण दिले. मराठा समाजातील युवकांना अडचण ठरू नये म्हणून राज्य सरकारने विशेष बाब म्हणून त्यांना नियुक्ती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. विशेष म्हणजे ऊर्जा विभागासाठीचे जे निकष आहेत, ते सर्व विभागातील नोकरभरतीसाठी लागू करण्यात येणार असल्याचे चव्हाण म्हणाले.साष्टपिंपळगाव येथील ग्रामस्थांचे आंदोलन समाजाचा घटक म्हणून निश्चितच प्रेरणादायी आहे असे सांगून, आपल्या सर्व मागण्यांवर मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन दिले. त्यामुळे हे आंदोलन आता मागे घ्यावे, अशी विनंतीदेखील त्यांनी केली.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणMaratha Reservationमराठा आरक्षण