पतंगाची दोरी ठरतेय मुलांसाठी जीवघेणी...!

By Admin | Updated: November 7, 2014 23:33 IST2014-11-07T22:39:45+5:302014-11-07T23:33:09+5:30

साताऱ्यातील चित्र : किरकोळ अपघातात वाढ.पालकांनी--मुलांनी ही काळजी घ्या--अपघात झाल्यास

The battle for the kidneys is a life threatening ...! | पतंगाची दोरी ठरतेय मुलांसाठी जीवघेणी...!

पतंगाची दोरी ठरतेय मुलांसाठी जीवघेणी...!

सातारा : दिवाळीनंतर सुरू होणाऱ्या पतंगोत्सवामुळे आकाशात विविध रंग आणि आकारातील पतंग पाहून मन हरकून जाते; पण जावे त्यांच्या वंशा म्हणतात त्याप्रमाणे या नेत्रसुखद पतंगांचा आविष्कार कोणासाठी अत्यंत धोकादायक ठरत असल्याचे दिसत आहे.
सध्या अनेक ठिकाणी दुपारच्यावेळी मोठ्या प्रमाणावर पतंग उडविणारे मुलांचे दर्शन घडते. कोणी घराच्या गच्चीवर, बांधकामांवर तर कोणी अपार्टमेंटच्या टेरेसवर पतंगबाजीचा आनंद घेतात. पतंग उडविण्यात मुलं इतकी मग्न असतात की, काहीदा त्यांना धोक्याचीही जाणीव उरत नाही. कित्येकदा टेरेसवरून खाली पडून जखमी झालेल्या मुलांना कायमचे अपंगत्वही आल्याचे पाहायला मिळते.पतंग उडविण्याचा आनंद मुलींपेक्षा मुलं अधिक घेतात. सुटीचा दिवस हा त्यासाठी राखीव असतो. खेळण्यात मग्न असणाऱ्या या मुलांना कुठल्याही परिस्थितीत कोणाचाही हस्तक्षेप नको असतो. म्हणून घरातून कोणीही कितीही ओरडून सांगितले तरीही त्याकडे दुर्लक्ष करत ही मुलं पतंगबाजीचा आनंद घेतात; पण सगळ्यांनाच पतंग उडविण्याचा उत्साह असल्यामुळे कोणीही सुरक्षिततेची काळजी घेण्याची तमा करत नाही. यामुळे होणारे अपघात आयुष्यभर मनामध्ये घर करून राहतात.सुटीच्या दिवशी मुलांची पतंगबाजी सर्वाधिक सुरू असते. पतंग उडविण्यासाठी मुलं बोगदा परिसरातही जात असल्याचे दिसते. रस्त्यावर पतंगबाजी सुरू असल्यामुळे वाहनचालकांच्या गळ्याभोवती मांजा अडकणे, पतंग पकडताना मुलं अचानक गाडीसमोर येणे, असे काही प्रकार घडतात. (प्रतिनिधी)
सुटी असल्यामुळे आम्ही कासला फिरायला आलो होतो. बोगद्याकडून कासकडे जाताना असणाऱ्या एका वळणावर दहा वर्षांचा एक मुलगा पतंग पकडण्याच्या नादात अचानक गाडीसमोर पळत आला. काही कळायच्या आतच समोर मुलगा आल्याने मी जोरात ब्रेक दाबला. यामुळे गाडीतील लोक परस्परांच्या अंगावर आदळले. त्यात माझ्या सासूला डोळ्याला इजा झाली. त्यामुळे त्यांना तातडीने दवाखान्यात न्यावे लागले. पर्यटनाचा पूर्ण दिवस दवाखान्यात गेला.
- परेश ओसवाल, पर्यटक


पालकांनी--मुलांनी  ही काळजी घ्या
पतंगबाजी करताना मुलांवर लक्ष ठेवा
मुलं कितीही मोठे असले तरीही त्याच्याबरोबर घरातील मोठी व्यक्ती आवश्य ठेवा
मुलांना सुरक्षित ठिकाणी पतंग उडवायला घेऊन जा
शक्यतो मोकळ्या मैदानावर पतंंगबाजी करू द्या
पतंग काटाकाटीमागे मुलांना पळू देऊ नका
मुलांनी ही काळजी घ्या
उंचावर चढून पतंगबाजी करण्याचा मोह टाळा
एकाच वेळी सगळ्यांनी पतंगबाजी करू नका
पतंगबाजी करताना हुल्लडबाजी टाळा
काटलेल्या पतंगाच्या मागे पळताना वाहनांकडेही लक्ष द्या
कितीही मोह झाला तरीही उंचावर अडकलेल्या पतंग काढण्याचा प्रयत्न करू नका

अपघात झाल्यास काय कराल?
संबंधित मुलाच्या पालकांना तातडीने याची माहिती द्या
जखम किरकोळ दिसत असली तरीही वैद्यकीय सल्ला घ्या
अपघातग्रस्ताचे घर लांब असेल किंवा घरात कोणी नसेल तर शेजारच्यांच्या मदतीने प्रथमोपचार करा
पालक ओरडण्याची भीती वाटत असली तरीही पालकांना याविषयी माहिती द्या
पतंग उडवायला लांब जाणार असाल, तर सोबत प्रथमोपचारचे कीट सोबत ठेवा.

Web Title: The battle for the kidneys is a life threatening ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.