बार्सिलोनाचे ऐतिहासिक विजेतेपद

By Admin | Updated: June 8, 2015 00:52 IST2015-06-08T00:46:26+5:302015-06-08T00:52:39+5:30

बलाढ्य बार्सिलोना संघाने एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात इटलीच्या ज्युवेंट्स संघाचा ३-१ असा फडशा पाडून चॅम्पियन लीग स्पर्धेत इतिहास नोंदविताना पाचव्यांदा विजेतेपद पटकावले.

Barcelona's historic title | बार्सिलोनाचे ऐतिहासिक विजेतेपद

बार्सिलोनाचे ऐतिहासिक विजेतेपद

एका शाळेतून भरदिवसा ११ ते १४ वर्षांच्या २१९ विद्यार्थिनींना पळवून नेले, त्यांना डांबून ठेवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले, काहींशी जबरदस्तीने लग्न करून त्यांना इस्लाम कबूल करण्यास भाग पाडले, तर काहींची विक्री केली. पैकी २०० मुलीं गर्भवती राहिल्या. एकीला तर एचआयव्ही झाल्याचे निष्पन्न झाले असून, दहशतवाद्यांकडूनच तिला या रोगाची लागण झाल्याचा मानवी हक्क संघटनेचा संशय आहे.
क्रूर आणि स्वत:ला इस्लामचा शुद्ध अवतार मानणाऱ्या ‘बोको हराम’ संघटनेने नायजेरिया देश ग्रासलेला आहे. मूलतत्त्ववाद्यांची ही दहशतवादी संघटना. सहा वर्षांपासून तिचा प्रभाव व कार्यक्षेत्र वाढत आहे. यामुळे नायजेरियाच्या राष्ट्रीय सुरक्षेस मोठा धोका निर्माण झाला आहे. नायजेरिया हा आफ्रिका खंडातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश. मुबलक खनिज तेल असलेला; परंतु या तेलाचे उत्खनन करण्याचे तंत्रज्ञान त्या देशाकडे नाही आणि भांडवलाचाही अभाव. निम्मी लोकसंख्या इस्लामचे पालन करते. उर्वरित ख्रिश्चन आहेत. इस्लामीमध्येही सुन्नी पंथियांचे प्राबल्य आहे. या देशातील तेलावर पाश्चात्त्य कंपन्यांची मालकी असल्यामुळे या तेलकंपन्या आणि आपल्या देशातील ख्रिस्ती धर्मीय यांच्यात साटेलोटे असल्याचा समज इस्लाम धर्मीयांकडून पसरवला गेला. आधुनिक शिक्षणालाही त्यांचा विरोध असल्याने इस्लामी धर्ममार्तंडांच्या शाळेतच पाल्यांना घालावे लागते. याचाच फायदा नायजेरियातील ‘जमाते अहालिस सुन्ना लिदावती रवल जिहाद’ या कडव्या इस्लामवादी संघटनेने घेतला. पाश्चात्त्य आणि ख्रिश्चनांना या देशातून घालवून देणे हे या संघटनेचे ध्येय असून, हा देश इस्लामच्या तत्त्वावर चालणारा व्हावा, असे त्यांना वाटते. त्यामुळे जे जे आधुनिक ते सर्व या संघटनेस नकोसे आहे. महंमद युसूफ हा या संघटनेचा प्रमुख. त्याच्या निर्घृण कारवाया पाहून या संघटनेस स्थानिकांनी नवे नाव दिले ‘बोको हराम’. जे जे आधुनिक ते ते हराम, म्हणजे नकोसे असा त्याचा अर्थ.
ल्ल संकलन : प्रकाश मुंज.


उपाय
कॅमेरुनची राजधानी येऊंडे येथे मध्य आफ्रिकन देशांच्या नेत्यांची बैठक झाली. या परिषदेचा नायजेरिया सदस्य नसला तरी या बैठकीत बोको हरामविरोधात करावयाच्या कारवाईसाठी ७.६ कोटी युरो इतका निधी उभारण्याचे मान्य करण्यात आले आहे. याचबरोबर बोको हरामच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी मदत करण्याचे आवाहन आंतरराष्ट्रीय समुदायास केले आहे. सध्या अमेरिकेने देखील मदतकार्य सुरू केले आहे. संयुक्त राष्ट्राने देखील चिंता व्यक्त केली आहे. यावर एकमात्र लष्करी मार्गांनी उत्तर शोधता येत नाही तर प्रथम विकासाचे मार्ग प्रयत्नपूर्वक आखावे लागतील. पाश्चिमात्य प्रसारमाध्यमे व राजकीय नेत्यांनीदेखील या दहशतवाद्यांविरोधात तगडी मोहीम सुरू करावी लागेल. तरच नायजेरिया नाही तर जगातील दहशतवाद्यांचे मूळ नष्ट होण्यास सुरुवात होईल.


संघटनेची अमानवीय कृत्ये
शाळांवर हल्ले करून त्या उद्ध्वस्त करणे
मुलांना पळवून नेणे व मदरसांकडे सोपविणे
युवकांना संघटनेत समाविष्ट करून घेणे
नागरिकांना रांगेत उभे करून गोळ्या घालणे
मुलींचे अपहरण करून त्यांना गुलाम बनविणे
तरुणी व महिला पळवून नेणे
त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणे
त्यांना गर्भवती बनविणे, त्यांची विक्री करणे
कैद्यांची सुटका करून संघटनेत सामिल करणे
नाताळ व नववर्षदिनी हत्याकांड घडवणे


इस्लामी शिक्षण व हिंसाचार
या युसूफने संघटना स्थापनेनंतर (२०००) मध्ये मैदुगुरी शहरात स्वतंत्र आणि भव्य मशीद बांधली आणि परिसरातच इस्लामी शिक्षण देऊ शकेल, अशी शाळाही सुरू केली. स्थानिक, गरीब मुस्लिम कुटुंबातील मुलांसाठी हीच शाळा आधार होती. या क्षेत्रात स्थिरावल्यावर युसूफ याच्या राजकीय महत्त्वाकांक्षा वाढू लागल्या आणि पुरेसे अनुयायी जमल्यावर २००९ साली त्याने मोठ्या प्रमाणावर नायजेरियात हिंसाचार घडवून आणला. सरकारने लष्कर पाठवून हे बंड मोडून काढले. यात युसूफ मारला गेला. मग या संघटनेची सूत्रे अबुबकर शेकाव याच्याकडे आली. सध्या ही संघटना गावागावांत घुसून महिलांवर लैंगिक अत्याचार करत आहे. गावेच्या गावे रॉकेट लाँचर्स, ग्रेनेड, एके-५६ अशा शस्त्रांनी निर्मनुष्य करत आहेत. गेल्या सहा वर्षांत दहशतवाद्यांच्या हिंसाचारात १३ हजार नागरिक ठार झाले आहेत, तर अत्याचाराच्या भीतीने लाखो लोक बेघर झाले आहेत.


हे त्यांचे पोशिंदे
अमली पदार्थांपासून आफ्रिकेच्या जंगलातील वन्य प्राण्यांची कातडी, हाडे इथवरची मोठी बाजारपेठ पाश्चिमात्य राष्ट्रांत आहे. याच्या तस्करीतून बोको हरामकडे पैसा येतो. संघटनेचे पालकत्व ‘अल कायदा’कडे आहे.
तर बोको हराम व इसीस यांच्यातही समन्वय असल्याचे सीआयएचेदेखील म्हणणे आहे.

Web Title: Barcelona's historic title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.