शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

"झोपडपट्टयांना २५०० रूपये अन्..."; बारामतीत २०० कोटी वाटल्याचा रोहित पवारांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 16:12 IST

Rohit Pawar on Ajit Pawar : आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत

Baramati Loksabha Election :  बारामतीच्या लोकसभा निवडणुकीकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलं आहे. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशा अटीतटीच्या लढतीसाठी पवार कुटुंबिय मैदानात उतरलं आहे. निवडणुकीच्या सुरुवातीपासून अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरुच होते. अशातच आता बारामतीमध्ये मतदानाच्या आदल्या दिवशी पैसे वाटले गेल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. यासोबत अजित पवार यांच्या ताब्यात असलेली बँक मध्यरात्री देखील सुरु असल्याचे रोहित पवार म्हणाले. तसेच यासाठी जवळपास २०० कोटी रुपये खर्च केल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं.

रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. बारामती मतदारसंघात चक्क पोलीस ‘बंदोबस्तात’ पैशांचा पाऊस पडतोय अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली होती. त्यानंतर रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत  झोपडपट्टयांना  २५०० रूपये आणि ज्यांच्याकडे गाड्या आहेत त्यांना ५ हजार रूपये वाटल्याचा आरोप केला. तसेच पैसै वाटण्याचा हा आकडा २०० कोटीच्या आसपास असल्याचा खुलासा देखील रोहित पवारांनी केला.

"दादा बरोबर म्हणाले माझं डोकं फिरलंय. २०० ते ३०० कोटी एवढा मोठा आकडा तो पण एका निवडणुकीसाठी. एवढा मोठा आकडा जर आमदारकीसाठी दादांनी वापरला असता तर १४४ च्या पुढे आम्ही गेलो असतो. एकहाती सत्ता आली असती आणि अजित दादा मुख्यमंत्री झाले असते. तुम्ही बहिणीला पाडण्यासाठी अशा गोष्टीचा वापर करता. दुदैव आहे की बहिणीला पाडण्यासाठी सहा महिन्यापूर्वी दादा संपूर्ण यंत्रणा घेऊन गेले. त्यावेळेस आम्हाला वाटलं की तिसऱ्या कोणाला संधी दिली जाईल. पण त्यांनी घरातलाच उमेदवार उतरवला. त्यामुळे बहिणीने तुमच्यावर जो विश्वास ठेवला त्याचा तुम्ही विश्वासाघत केला," असेही रोहित पवार म्हणाले.

दरम्यान, रोहित पवार यांच्या आरोपांवर अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं. "हे काम निवडणूक आयोगाचे आहे. आजपर्यंत एक लोकसभा आणि सात विधानसभा निवडणुका मी लढवल्या आहेत. मी असले प्रकार कधी करत नाही. पहिल्यापासून विरोधकांतील काही बगलबच्चे अशाच प्रकारचे आरोप करत होते, पण मी त्याला फार महत्त्व देत नाही," असं अजित पवार म्हणाले.  

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४baramati-pcबारामतीAjit Pawarअजित पवारRohit Pawarरोहित पवारSupriya Suleसुप्रिया सुळे