शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2024 18:01 IST

तिसऱ्या टप्प्यात राज्यातील असे काही मतदारसंघ आहेत, ज्यांच्यावर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Rohit Pawar : आज तिसऱ्या टप्प्यातील मतदारसंघातील प्रचाराचा धुरळा खाली बसणार आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्ष शक्य तेवढे शक्तीप्रदर्शन आणि सभांच्या माध्यमांतून आपला प्रचार करत आहे. तिसऱ्या टप्प्यात राज्यातील असे काही मतदारसंघ आहेत, ज्यांच्यावर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. त्यातीलच एक म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ. सुनेत्रा पवार विरूद्ध सुप्रिया सुळे अशी थेट लढत इथे होत आहे. प्रथमच पवारांच्या घरातील दोन उमेदवार रिंगणात असल्यामुळे ही निवडणूक महत्त्वाची आहे. आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी बारामतीत प्रचारसभा घेत एकमेकांवर टीकेचे बाण सोडले. 

इतिहासात प्रथमच बारामतीत दोन सभा होत आहेत. एकिकडे अजित पवार हे पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासाठी मत मागत आहेत, तर दुसरीकडे शरद पवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी मैदानात आहेत. शरद पवार आणि अजित पवार दोघांची सभा होत आहे. बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ बोलताना आमदार रोहित पवार गहिवरले. त्यांनी अजित पवार गटासह महायुतीवर सडकून टीका केली. अजित पवारांच्या शब्दाला तिकडे किंमत नसल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी बोलताना रोहित पवार यांनी शरद पवारांचे शब्द सांगितले अन् सारेच स्तब्ध झाले. ते म्हणाले की, राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर टीव्हीवर बऱ्याच बातम्या सुरू होत्या. तेव्हा शरद पवार साहेबांप्रमाणे आम्ही देखील सर्वकाही पाहत होतो. पण पवार साहेबांच्या भावना सर्वकाही सांगत होत्या. मात्र, परिस्थिती तशी असताना देखील त्यांनी काळजी करू नका असे आम्हाला सांगितले होते. 

तसेच रोहित पवारांनी शरद पवारांनी सांगितलेले शब्द उच्चारताना त्यांना अश्रू अनावर झाले. "जोपर्यंत लढण्यासाठी नवी पिढी तयार होत नाही तोवर मी डोळे मिटणार नाही", असे पवार साहेबांनी सांगितले असल्याचा खुलासा रोहित पवारांनी केला. त्यांनी हे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच सन्नाटा पसरला. सर्वजण स्तब्ध झाले... हा प्रसंग सांगताना रोहित पवार ढसाढसा रडू लागले. मग पुन्हा हे शब्द वापरू नका आम्ही लढण्यासाठी सज्ज आहोत, अशी ग्वाही रोहित पवार यांनी शरद पवारांना दिली. 

टॅग्स :baramati-pcबारामतीRohit Pawarरोहित पवारSharad Pawarशरद पवारSupriya Suleसुप्रिया सुळेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४