बारामती तापाने फणफणली
By Admin | Updated: August 22, 2014 23:37 IST2014-08-22T23:37:07+5:302014-08-22T23:37:07+5:30
शहर व तालुक्यात विषाणूजन्य आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

बारामती तापाने फणफणली
बारामती : शहर व तालुक्यात विषाणूजन्य आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. डेंग्यूसह अन्य आजारांनी सरकारी आणि खासगी रुग्णालयांत मागील आठवडाभरात रुग्ण वाढले आहेत. आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन सव्रेक्षण सुरू केले आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात जंतुनाशक फवारणी केली जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. मागील आठवडय़ात जवळपास 8 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. तालुक्यातील उंडवडी सुपे येथे 2 रुग्ण डेंग्यूचे आढळले.
1क्क् ते 15क् हून अधिक रुग्ण थंडीतापाने बेजार आहेत. शहरातील ठरावीक भागांतच सार्वजनिक स्वच्छतेच्या बाबतीत दखल घेतली जात आहे. अनेक भागांत कच:यांचे ढीग साठलेले असतात. पाण्याचा निचरा होत नसल्याने ठिकठिकाणी पाण्याचे डबके साठतात. या पाण्यातच डेंग्यूचे डास तयार होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे संपूर्ण बारामती शहरात व्यापक स्वरूपात जंतुनाशक फवारणी, फॉगिंग मशिनद्वारे फवारणी करणो आवश्यक आहे, त्याकडे मात्र नगरपालिकेच्या माध्यमातून दुर्लक्ष होत आहे, अशी नागरिकांची भावना आहे.
मात्र, बारामती नगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे शहरातील स्वच्छतेच्या बाबतीत योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. बारामती शहरात विषाणूजन्य आजारांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, नागरिकांनी स्वच्छतेच्या बाबतीत नगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन बारामती नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे आरोग्य निरीक्षक सुभाष नारखेडे यांनी केले आहे.
47 जण उपचार घेऊन घरी सोडण्यात आले आहेत, तर सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय परिसरात वास्तव्यास असणा:या ज्येष्ठ नागरिकांवर पुणो शहरातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू होते. या ज्येष्ठ नागरिकांनादेखील घरी सोडण्यात आले आहे. मात्र, त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
बारामती शहरात सर्वच ठिकाणी डेंग्यूला कारणीभूत ठरणा:या डासांच्या अळ्या आढळल्या आहेत. या ठिकाणी पाणीसाठे स्वच्छ करून धुरळणी करण्यात येत आहे. उंडवडी सुपे येथे दोन डेंग्यूचे रुग्ण आढळले. त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत.
- डॉ. महेश जगताप, तालुका वैद्यकीय अधिकारी