शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 19:56 IST

दुसरा नवखा बारामतीकडे बघू शकतो का असाही सवाल अजित पवार यांनी केला आहे.

Baramati Assembly Constituency : बारामती लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागलं आहे. लोकसभेला अजित पवार यांना मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. तर यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही अजित पवार यांच्यासमोर पुतण्या युगेंद्र पवार यांचे आव्हान आहे. युगेंद्र पवार यांच्या पाठीशी शरद पवार हेसुद्धा ठामपणे उभे आहेत. त्यामुळे ही लढाई अटीतटीची होणार आहे. अशातच आता मलाच आता या बारामतीचे सगळं बघावं लागणार असल्याचे विधान अजित पवार यांनी केलं आहे.

बारामती मतदारसंघातल्या लोणी आणि कडेपाठार येथे अजित पवार यांनी आज सभा घेतली. या सभांमधून पुन्हा एकदा काका पुतण्या वादाचा नवा अंक पाहायला मिळाला आहे. शरद पवार रिटायर झाल्यानंतर बारामती मीच बघणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटलं आहे. यावेळी अजित पवार यांनी युगेंद्र पवार यांच्यावरही बोचरी टीका केली आहे.

"परवा मी साहेबांचे भाषण ऐकले साहेबांनी काही गावांना भेटी दिल्या त्यावेळेस ते म्हणाले की अजून दीड वर्षांनी मी थांबणार आहे आणि इतरांनी सगळं बघायचं. साहेब रिटायर झाल्यानंतर दीड वर्षांनी तुमच्याकडे कोण बघू शकतं. ही माझी हुशारकी म्हणून नाही. पण दुसरा नवखा बघू शकतो का. त्याला याच्यातले काही माहिती आहे का. तो शिकेल नाही असे नाही. आम्ही देखील आईच्या पोटातून शिकून आलेलो नाही. काही वर्ष काम करावं लागतं लोकांचे प्रश्न समजून घ्यावे लागतात. आम्ही पण साहेबांच्याच विचाराने पुढे जाणार आहोत. मी कुठे त्याच्यामध्ये बदल केलेला आहे," असं अजित पवार म्हणाले.

"माझी आपल्याला विनंती आहे की मलाच आता या बारामतीचे सगळं बघावं लागणार आहे. कारण सगळ्यांच्या वयाचा विचार करता. सुप्रियाच्या वेळेस सुद्धा सांगायचे की ही शेवटची निवडणूक आहे. त्यामुळे तुम्ही सुप्रियांकडे लक्ष दिलं तो तुमचा अधिकार आहे मला त्याबद्दल काही म्हणायचं नाही‌. आता पण साहेबांची ही शेवटची निवडणूक आहे त्यामुळे नातवाकडे लक्ष द्या असं सांगितलं जात आहे. आता हे तर कठीणच झालं. पोरगा सोडला आणि नातूच पुढे केला. मी पुतण्या असलो तरी मुलासारखाच आहे. माझ्यात काय कमी आहे, मी काय कमी केलेले आहे," असं अजित पवारांनी म्हटलं.

"मी आज राज्याचा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून काम करत आहे. मी साडेसहा लाख कोटींचा अर्थसंकल्प सांभाळत आहे. त्याच्यामध्ये त्याला म्हणावं साडेसहा लाख कोटी मध्ये टिंब काढून दाखव. तो माझा पुतण्याच आहे त्यामुळे टीका करणे योग्य नाही," असेही अजित पवार म्हणाले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४western maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024baramati-acबारामतीAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारbig Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४