भुसावळच्या प्रकरणाची चौकशी करणार : बापट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2017 01:31 IST2017-03-31T01:31:28+5:302017-03-31T01:31:28+5:30
मुंबईत केलेल्या तपासणीत १.२८ लाख बोगस शिधापत्रिका आढळल्या आहेत. त्यातील ५५ हजार शिधापत्रिका

भुसावळच्या प्रकरणाची चौकशी करणार : बापट
मुंबई : मुंबईत केलेल्या तपासणीत १.२८ लाख बोगस शिधापत्रिका आढळल्या आहेत. त्यातील ५५ हजार शिधापत्रिका तातडीने रद्द करण्यात आल्या. रेशन व्यवस्थेतील गैरप्रकार रोखण्यासाठी यापुढे प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला बायोमेट्रिक पद्धतीने रेशन देण्यात येईल, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी आज विधानसभेत सांगितले.
भुसावळ (जि. जळगाव) येथील बोगस शिधापत्रिका प्रकरणी स्वस्त धान्य दुकानावर कारवाईसंदर्भात शिवसेनेचे डॉ. संजय रायमूलकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर म्हणाले की, लोकप्रतिनिधींनी यासंदर्भात ज्या तक्रारी केल्या आहेत, त्या तक्रारींची शासनाने दखल घेऊन कारवाई केली आहे. तसेच या प्रकरणाची फेरचौकशी जिल्ह्याबाहेरील अधिकाऱ्याकडून केली जाईल, असे बापट म्हणाले.