पुणे : राज्यात आतापर्यंत तब्बल ८ लाखांपेक्षा जास्त डिजिटल स्वाक्षरित सात-बारा ऑनलाईन डाऊनलोड झाले आहेत. तसेच, ई हक्क प्रणालीत सुमारे साडेसात हजार ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले असून, त्यातील ४ हजार अर्ज निर्गत झाले आहेत. या प्रणालीचा वापर करून कोणत्याही बँकेला सात-बाऱ्यांवर बोजा दाखल करणे, तसेच कर्ज परतफेड केल्यानंतर सात-बाऱ्यांवरील बोजा कमी करण्यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार आहे. यामुळे यापुढे राज्यातील सर्व बँकांना आपल्या बँकिंगच्या अधिकृत कामांसाठी ऑनलाईन सात-बाऱ्यांचा वापर करावा, असे आदेश राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दिले आहेत. तसेच, यापुढे सर्व कायदेशीर व शासकीय कामांसाठी ऑनलाईन सात-बारा ग्राह्य धरण्याचे आदेशदेखील त्यांनी दिले.
बँकांनी ऑनलाईन सात-बारा वापरणे बंधनकारक : मुख्य सचिव अजोय मेहता यांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2020 22:30 IST
सर्व शासकीय व कायदेशीर कामांसाठी ऑनलाईन सात-बारा ग्राह्य धरणार
बँकांनी ऑनलाईन सात-बारा वापरणे बंधनकारक : मुख्य सचिव अजोय मेहता यांचे आदेश
ठळक मुद्देतब्बल २ कोटी ५२ लाख सात-बाऱ्यांपैकी २ कोटी ४४ लाख सातबारे डिजिटल स्वाक्षरित सात-बारे राज्यातील सामान्य जनतेला महाभूमीच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करण्यास उपलब्ध