करमाळ्यातील महाराष्ट्र बँकेचा स्लॅब कोसळला; एक जण ठार, २५ कर्मचारी जखमी

By Appasaheb.patil | Published: July 31, 2019 01:01 PM2019-07-31T13:01:07+5:302019-07-31T13:16:19+5:30

करमाळ्यातील घटना; आणखीन कर्मचारी व ग्राहक ढिगाºयाखाली अडकल्याची भिती

Bank slab collapsed; 1 employee injured | करमाळ्यातील महाराष्ट्र बँकेचा स्लॅब कोसळला; एक जण ठार, २५ कर्मचारी जखमी

करमाळ्यातील महाराष्ट्र बँकेचा स्लॅब कोसळला; एक जण ठार, २५ कर्मचारी जखमी

googlenewsNext
ठळक मुद्दे- बँक आॅफ महाराष्ट्रचे कर्मचारी अडकले- जखमींवर कुटीर रूग्णालयात उपचार सुरू- पोलीस प्रशासन व नगरपरिषदेचे कर्मचाºयांकडून बचाव कार्य सुरू

सोलापूर : करमाळा शहरातील बँक आॅफ महाराष्ट्र शाखेवरील लोखंडी स्लॅब कोसळल्याने २५ ते ३० बँक कर्मचाºयांसह १० ग्राहक अडकले आहेत़ यातील १५ जखमींना उपचारासाठी रूग्णालयात पाठविण्यात आले असून उर्वरित कर्मचाºयांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. या घटनेत एक जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. प्रशांत बागल वय-३७ रा.भोसरे ता.माढा असे ठार झालेल्या बँक ग्राहकाचे नाव आहे. मयत बागल हे प्रतापसिंह मोहिते-पाटील महाविद्यालयात लिपीक पदावर कार्यरत होते.

करमाळा शहरात महिंद्र नगर भागात राजेश दोशी यांची तीन मजली इमारत आहे. या इमारतीच्या खालच्या बाजुस बँक आॅफ महाराष्ट्र आहे़ बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास अचानकपणे पहिल्या मजल्यावरील लोखंडी  अँगल व फरशीचा स्लॅब कोसळला. यावेळी बँकेत काम करणारे २५ ते ३० कर्मचारी स्लॅबखाली अडकले होते़ त्यातील १५ कर्मचाºयांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले असून उर्वरित कर्मचाºयांना बाहेर काढण्यासाठी नगरपरिषद व पोलीस प्रशासन प्रयत्न करीत आहे़ जखमींवर करमाळ्यातील कुटीर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.



 

Web Title: Bank slab collapsed; 1 employee injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.