शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

वांद्रे-वरळी सी लिंक मुंबई-दिल्ली महामार्गाला जोडणार; समुद्रात उभारणार ५० हजार कोटींचा पूल : गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 11:57 IST

Nitin Gadkari : ५० हजार कोटी रूपयांचा पूल उभारण्याची योजना असल्याची गडकरी यांची माहिती. पायाभूत सुविधांचा विचार करून मुंबईत विकास व्हावा, गडकरी यांचं वक्तव्य.

ठळक मुद्दे५० हजार कोटी रूपयांचा पूल उभारण्याची योजना असल्याची गडकरी यांची माहिती. पायाभूत सुविधांचा विचार करून मुंबईत विकास व्हावा, गडकरी यांचं वक्तव्य.

वांद्रे वरळी सी लिंक दिल्ली-मुंबई महामार्गाला जोडण्याची योजना असल्याची मोठी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. यासाठी ५० हजार कोटी रूपयांचा उड्डाणपूल समुद्रात उभारण्याची योजना असल्याचं गडकरी म्हणाले. 

"वांद्रे वरळी सी लिंक, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, ५५ उड्डाणपूल अशी अनेक कामं केली. त्या काळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, नारायण राणे असे अनेक जण होते. मला वांद्रे वरळी सी लिंक हा वसई विरारच्या पलिकडे नेऊन मुंबई दिल्ली महामार्गाला जोडायचा होता. ती एक गोष्ट राहून गेली. सध्या दिल्ली मुंबई महामार्गाची उभारणी केली जात असून तो जेएनपीटीपर्यंत आहे. १ लाख कोटींचा हा प्रकल्प अशून त्याचं ६० टक्के काम पूर्ण झालं आहे. तोच महामार्ग वांद्रे वरळी सी लिंकपर्यंत पोहोचवण्याचं माझं स्वप्न असून त्यासाठी समुद्रात ५० हजार कोची रूपयांचा खर्चं येणार आहे," अशी माहिती गडकरी यांनी दिली. 

राज्य सरकारशी चर्चा करणार"या संदर्भात महाराष्ट्र सरकारशी चर्चा केली जाणार असून त्यांची परवानगी मिळाल्यानंतरच या उड्डाणपूलाची उभारणी केली जाईल. सध्या त्यावर अभ्यास सुरू असून हा पूल असता तर आज वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहनांची गर्दी झाली नसती," असं त्यांनी नमूद केलं. एबीपी माझाशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर वक्तव्य केलं. वांद्रे वरळी सी लिंक प्रकल्प करून रस्ता वाढवला जाईल. कारण ही मुंबईची लाइफलाइन असल्याचं त्यांनी नमूद केलं. 

मुंबईत विकासासाठी जागा नाही"महाराष्ट्र हे प्रगतीशील आणि समृद्ध राज्य आहे. पायाभूत सुविधांचा विचार करूनच मुंबईचा विकास केला गेला पाहिजे. मुंबईच्या बाजूला समुद्र असल्यामुळे आता जागाच शिल्लक राहिली नाही. नवी मुंबईतही गर्दी धाली आहे. महाराष्ट्रात मुंबईतील उद्योग व्यवसायांचं विकेंद्रीकरण झाल्यास राज्याचा विकास होईल. पुढील २५ वर्षांचा विचार करून सल्ला मसलतीनंतर राज्य सरकारनं डॉक्युमेंट तयार करावं," असं गडकरी म्हणाले. 

टॅग्स :Bandra Worli Sea Linkवांद्रे-वरळी सी लिंकNitin Gadkariनितीन गडकरीMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेGopinath Mundeगोपीनाथ मुंडेNarayan Raneनारायण राणे