वांद्रे, तासगावचा आज फैसला

By Admin | Updated: April 15, 2015 02:17 IST2015-04-15T02:17:45+5:302015-04-15T02:17:45+5:30

तासगाव (जि़ सांगली) : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या वांद्रे (पूर्व) आणि तासगाव-कवठे महांकाळ विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल बुधवारी होत आहे़

Bandra, Tasgaon today decided | वांद्रे, तासगावचा आज फैसला

वांद्रे, तासगावचा आज फैसला

मुंबई / तासगाव (जि़ सांगली) : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या वांद्रे (पूर्व) आणि तासगाव-कवठे महांकाळ विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल बुधवारी होत आहे़
वांद्रेतील समाज मंदिरातील निवडणूक कार्यालयात सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होईल. एकूण १९ फेऱ्या होणार असून, साडे अकरापर्यंत निकाल घोषित होण्याची शक्यता आहे़ तर तासगाव येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये सकाळी ८ वाजता मतमोजणीस प्रारंभ होणार असून, मतमोजणीच्या २२ फेऱ्या होणार आहेत.
पहिल्या फेरीत उमेदवारांना पडलेली मते साधारण ९पर्यंत स्पष्ट होतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर
दोन्ही ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Bandra, Tasgaon today decided