‘सनबर्न’मध्ये मद्य, सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 02:43 IST2017-12-15T02:43:25+5:302017-12-15T02:43:37+5:30

पुण्यातील आॅक्सफर्ड गोल्फ रिसॉर्ट येथे २८ ते ३१ डिसेंबरदरम्यान परसेप्ट लाइव्ह लि.ने आयोजित केलेल्या सनबर्न या संगीत कार्यक्रमात मद्य, सिगारेट, तंबाखू व अन्य तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालावी, अशी विनंती करणारी याचिका एका सामाजिक कार्यकर्त्याने उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

Ban on 'Sunburn' to sell alcohol, cigarettes, and tobacco products | ‘सनबर्न’मध्ये मद्य, सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी घाला

‘सनबर्न’मध्ये मद्य, सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी घाला

मुंबई : पुण्यातील आॅक्सफर्ड गोल्फ रिसॉर्ट येथे २८ ते ३१ डिसेंबरदरम्यान परसेप्ट लाइव्ह लि.ने आयोजित केलेल्या सनबर्न या संगीत कार्यक्रमात मद्य, सिगारेट, तंबाखू व अन्य तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालावी, अशी विनंती करणारी याचिका एका सामाजिक कार्यकर्त्याने उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या कार्यक्रमामुळे १५ वर्षांवरील मुलांना दारू, सिगारेटचे व्यसन लागल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
याचिकेनुसार, गेल्या वर्षी पुण्यात आयोजित आलेल्या कार्यक्रमात १५ वर्षांवरील मुलांना प्रवेश देण्यात आला होता. यंदाही वयाची हीच अट घालण्यात आली आहे. कायद्याने २१ वर्षांखालील मुलांना बारमध्ये जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र या कार्यक्रमात शाळा-महाविद्यालयांतील लाखो मुले जात असतानाही खुलेआम दारू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यात येते. गोव्याच्या कार्यक्रमात पोलिसांना ड्रग्सही आढळले होते, अशी कार्यकर्ते रतन लूथ यांनी याचिकेत म्हटले आहे. तसेच गेल्या वर्षी कंपनीने एमआरपीपेक्षा जास्त किमतीला पाण्याच्या बाटल्या व मद्य विक्री केली होती. या वर्षी हा प्रकार घडू नये, यासाठी संबंधित प्रशासनाने लक्ष ठेवण्याचे निर्देश द्यावेत, अशीही विनंती याचिकेत केली आहे. या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे.

Web Title: Ban on 'Sunburn' to sell alcohol, cigarettes, and tobacco products