राज्यात प्रीपेड मीटरवर बंदी; इलेक्ट्रॉनिक मीटर बसवणार; मुख्यमंत्र्यांची विधानपरिषदेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 23:36 IST2025-03-05T23:36:16+5:302025-03-05T23:36:34+5:30

लवकरच राज्यभरात इलेक्ट्रॉनिक मीटर सिस्टीम कार्यान्वित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Ban on Prepaid Meters in State Electronic meters will be installed Chief Ministers information in Legislative Council | राज्यात प्रीपेड मीटरवर बंदी; इलेक्ट्रॉनिक मीटर बसवणार; मुख्यमंत्र्यांची विधानपरिषदेत माहिती

राज्यात प्रीपेड मीटरवर बंदी; इलेक्ट्रॉनिक मीटर बसवणार; मुख्यमंत्र्यांची विधानपरिषदेत माहिती

Maharashtra Government: राज्यातील वीज ग्राहकांसाठीच्या प्रीपेड वीज मीटरवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी आता इलेक्ट्रॉनिक मीटर प्रणाली बसवली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.

विधान परिषदेतील प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य विक्रम काळे यांनी राज्यातील वीज ग्राहकांकडे स्मार्ट प्री-पेड वीज मीटरबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, इलेक्ट्रॉनिक मीटर बसवण्याचे काम सुरू आहे. इलेक्ट्रॉनिक मीटर वापरणाऱ्या ग्राहकांना वीज वापरावर १० टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच सहा महिन्यांच्या कालावधीत हा बदल अंमलात आणण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवला जाणार आहे. लवकरच राज्यभरात इलेक्ट्रॉनिक मीटर सिस्टीम कार्यान्वित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Ban on Prepaid Meters in State Electronic meters will be installed Chief Ministers information in Legislative Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.