खेडेकरांच्या पुस्तकावर बंदी घाला
By Admin | Updated: July 22, 2015 01:09 IST2015-07-22T01:09:19+5:302015-07-22T01:09:19+5:30
मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर यांनी लिहिलेल्या ‘बहुजन हिताय’ पुस्तकावर तत्काळ बंदी घालून संबंधितांवर योग्य कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने केली,

खेडेकरांच्या पुस्तकावर बंदी घाला
मुंबई : मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर यांनी लिहिलेल्या ‘बहुजन हिताय’ पुस्तकावर तत्काळ बंदी घालून संबंधितांवर योग्य कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने केली, तर प्रकाशित मजकूर तपासून उचित बंदोबस्त केला
जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले. शिवसेना आ. सुनील प्रभू यांनी औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना या पुस्तकाचा विषय काढला होता. प्रभू म्हणाले, खेडेकरांच्या पुस्तकात बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांच्यासह भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसह सगळ्याच पक्षांच्या नेत्यांविषयी अत्यंत अवमानकारक मजकूर आहे. ब्राह्मण व बहुजन समजात भांडणे लावणारा मजकूर या पुस्तकात लिहिल्याने समाजात तेढ निर्माण होऊ शकते. त्यामुळे या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी प्रभू यांनी केली.
त्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, बाळासाहेब ठाकरे आम्हाला आदरणीय आहेत तर शरद पवार आणि आमचे राजकीय मतभेद असले तरी ते या राज्याचे आणि देशाचे महत्त्वाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी काही अनुचित लिहिले गेले असेल तर ते तपासून घेतले जाईल आणि सगळ्या गोष्टींचा उचित बंदोबस्त केला जाईल.