हिंदू राष्ट्र सेनेवर बंदी घाला

By Admin | Updated: June 12, 2014 04:38 IST2014-06-12T04:38:42+5:302014-06-12T04:38:42+5:30

संघटनेचा संस्थापक अध्यक्ष धनंजय जयराम देसाई (३४) याचा मोहसीनच्या खुनामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पुणे पोलिसांनी तातडीने याबाबतीतल्या हालचाली सुरू केल्या आहेत.

Ban Hindu Rashtra Sena | हिंदू राष्ट्र सेनेवर बंदी घाला

हिंदू राष्ट्र सेनेवर बंदी घाला

पुणे : कथित फेसबुक पोस्ट प्रकरणानंतर पुण्यात निर्माण झालेल्या तणावाला कारणीभूत ठरलेल्या तसेच मोहसीन शेखच्या खुनाला जबाबदार असलेल्या हिंदू राष्ट्र सेनेवर बंदी घालण्याच्या शिफारशीचा प्रस्ताव लवकरच राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त सतीश माथुर यांनी दिली. संघटनेचा संस्थापक अध्यक्ष धनंजय जयराम देसाई (३४) याचा मोहसीनच्या खुनामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पुणे पोलिसांनी तातडीने याबाबतीतल्या हालचाली सुरू केल्या आहेत.
संघटनेच्या कार्यकर्त्यांनी २ जून रोजी शेख मोहसीन मोहमंद सादीक (२८) यांची हत्या केली होती. हल्ल्यामध्ये अमीन हरून शेख (३०) आणि इजाज याकूब बागवान (२५) हे गंभीर जखमी झाले होते. मोहसीनच्या खुनानंतर हडपसर व लगतच्या परिसरात तणाव वाढला होता.

Web Title: Ban Hindu Rashtra Sena