Maharashtra Politics: संजय राऊतांना ‘जय महाराष्ट्र’; भाऊसाहेब चौधरींना शिंदेंकडून रिटर्न गिफ्ट, दिली मोठी जबाबदारी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 13:11 IST2022-12-26T13:10:35+5:302022-12-26T13:11:31+5:30
Maharashtra News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती देत भाऊसाहेब चौधरी यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Maharashtra Politics: संजय राऊतांना ‘जय महाराष्ट्र’; भाऊसाहेब चौधरींना शिंदेंकडून रिटर्न गिफ्ट, दिली मोठी जबाबदारी!
Maharashtra Politics: महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. एकनाथ शिंदेंनी केलेल्या मोठ्या बंडखोरीनंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि नेते आदित्य ठाकरे यांनी नागपुरात अधिवेशनाला हजेरी लावत सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. यातच ठाकरे गट आणि शिंदे गटातील संघर्षही वाढताना दिसत आहे. यातच संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले गेलेल्या भाऊसाहेब चौधरी यांनी अलीकडेच शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी भाऊसाहेब चौधरी यांना रिटर्न गिफ्ट म्हणून मोठी जबाबदारी दिल्याचे सांगितले जात आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह ठाकरे गटाला राम राम केलेल्या भाऊसाहेब चौधरी यांच्या खांद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी जबाबदारी दिली आहे. महाराष्ट्र सचिवपदाचे नियुक्ती पत्र भाऊसाहेब चौधरी यांना देण्यात आले आहे. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के उपस्थित होते. याबाबत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. एकनाथ शिंदे यांनी भाऊसाहेब चौधरी यांना भावी सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
संजय राऊत यांचे अत्यंत विश्वासू सहकारी शिंदे गटात
संजय राऊत यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळख असणारे भाऊसाहेब चौधरी यांनी ठाकरे गटाला मोठा धक्का देत शिंदे यांच्या गटात सामील झाले. मागील आठवड्यात भाऊसाहेब चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे ट्विट स्वतः संजय राऊत यांनी केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. संजय राऊत यांचे निकटवर्तीय म्हणून संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात भाऊसाहेब चौधरी यांचे मोठे राजकीय वजन होते. तसेच काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातील १२ नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"