शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रीपदाची शपथ घेताना बाळासाहेबांची आठवण झाली नाही, किशोरी पेडणेकरांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 15:35 IST

Kishori Pednekar : शिवसेना (Shivsena) नेत्या किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गटातील मंत्र्यांवर आणि भाजपवर निशाणा साधला आहे.

मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा काल मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) झाला. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर विरोधी पक्षांकडून आता राज्य सरकारवर टीका होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर, अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांच्या मंत्रीपदावरुन विरोधक टीका करत आहेत. दरम्यान, शिवसेना (Shivsena) नेत्या किशोरी पेडणेकर यांनीही शिंदे गटातील मंत्र्यांवर आणि भाजपवर निशाणा साधला आहे.

"जे मंत्री महोदय झाले, त्यांचा पाळणा वेगवेगळ्या पक्षात हलला. त्यानंतर ते आमच्याकडे आले, त्यांचाही आम्ही बहुमान केला. शिवसेना आमचीच, धनुष्यबाण आमचंच, बाळासाहेबही आमचेच असे म्हणणाऱ्यांना मंत्रीपदाची शपथ घेताना बाळासाहेबांची आठवण झाली नाही. मंत्रीपदाची शपथ घेऊन 12 तासांच्यावर वेळ उलटून गेला. पण एकही आमदाराला बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर जाऊन दर्शन घ्यावे, असे वाटले नाही. याचा अर्थ फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी बाळासाहेबांचे नाव वापरायचे आणि बाळासाहेबांच्या घराण्याला, ठाकरे घराण्याला संपवायचे कसे, याचा विडा यांनी उचलला आहे", असा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला.

याचबरोबर, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये व्यावसायिक मंगलप्रभात लोढा यांना मंत्रीपद दिल्यामुळे किशोरी पेडणेकर यांनी भाजपवर टीका केली आहे. बहुभाषिक मुंबईत, मराठी मुंबईत मंगलप्रभात लोढा हे विकासक आहेत, आमदार आहेत, भाजपने त्यांना मंत्रीपद दिले, पण आमच्यातून गेलेले, शिवसेनेला आई म्हणणारे मुंबईतील एकाही आमदाराला मंत्रीपद दिले नाही, ही मुंबईची शोकांतिका आहे, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर जवळपास एक महिन्याहून अधिक काळ मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. त्यामुळे विरोधी पक्षांतर्फे अनेकदा राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सरकारला घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, अखेर रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार मंगळवारी पार पडला. पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात एकनाथ शिंदे यांच्या गटातील 9 आणि भाजपच्या 9 आमदारांना मंत्रिमंडळाची शपथ घेतली आहे.

'या' नेत्यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथशिंदे गटातील आमदार तानाजी सावंत, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय राठोड, गुलाबराव पाटील यांनी आज कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. तर भाजपमधून गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित आणि मंगलप्रभात लोढा यांनी यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.

थोडी नाराजी तर आहेच - बच्चू कडू शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात अपक्ष आणि मित्रपक्षांना सहभागी करून घेण्यात आल्याचे दिसत नाही. त्यावरुन आता राजकीय चर्चा सुरू झाल्या आहे. 'प्रहार' संघटनेचे बच्चू कडू यांनी आपली नाराजी बोलून दाखवली. "नाराजी नाही असं नाही. थोडी नाराजी तर आहेच. कारण जो उशीरा आला त्याला पहिल्या पंगतीमध्ये बसवले गेले. आणि जो पहिला गेला त्याला शेवट बसवले जात आहे. पण राजकारणात थोडं कमी जास्त होत असते", असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Kishori Pednekarकिशोरी पेडणेकरPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे