शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेब थोरात- नाना पटोले वादाचा अहवाल गुलदस्त्यात; चेन्नीथला दिल्लीला परतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 09:06 IST

नाशिक पदवीधरचा गोंधळ कुणामुळे झाला? त्या संदर्भात ते टिप्पणी करतील, तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महाराष्ट्रातील निवडणुकांविषयीचे पक्षाचे नियोजन चेन्नीथला आपल्या अहवालात मांडण्याची शक्यता आहे.

मुंबई - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्या वादासंदर्भात चौकशी करून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला हे मंगळवारी दिल्लीला परतले. चेन्नीथला काय अहवाल देणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. 

नुकत्याच झालेल्या नाशिक पदवीधर विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवारीवरून प्रदेश काँग्रेसमध्ये गोंधळ झाला होता. काँग्रेस उमेदवाराने अर्ज भरला नाही आणि अपक्ष उमेदवार निवडून आला. त्यावरून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि पक्षाचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी एकमेकांवर आरोप केले होते. या परिस्थितीचे अवलोकन करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेसचे केरळमधील ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला यांना राज्यात पाठविले होते.

गेले तीन दिवस ते मुंबईत होते. काँग्रेसचे माजी मंत्री, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, आमदार, खासदार यांना ते भेटले. परळच्या टिळक भवनामध्ये सोमवारी त्यांनी अनेकांची मते जाणून घेतली. मंगळवारी त्यांनी नरिमन पॉइंट हॉटेलमध्ये अनेकांच्या भेटी घेतल्या. त्यामध्ये ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना पाचारण केले होते. बाळासाहेब थोरात यांनाही ते येथेच भेटले.

नाशिक पदवीधरचा गोंधळ कुणामुळे झाला? त्या संदर्भात ते टिप्पणी करतील, तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महाराष्ट्रातील निवडणुकांविषयीचे पक्षाचे नियोजन चेन्नीथला आपल्या अहवालात मांडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील पक्ष संघटन मजबूत आहे. आगामी निवडणुकीला प्रदेश कार्यकारिणी खंबीरपणे सामोरे जाईल, असा विश्वास चेन्नीथला यांनी मंगळवारी प्रसिद्धी माध्यमांकडे व्यक्त केला.

 

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेस