शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

'बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वाचे तेजस्वी रूप होते', बाळासाहेबांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून अभिवादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2021 14:56 IST

Uddhav Thackeray : मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

ठळक मुद्दे"शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांचे कार्य आणि नेतृत्व शब्दांत सामावणे अशक्य आहे. त्यांचे विचार पुढील पिढ्यांना देखील प्रेरणा देत राहतील."

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले. मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थित खासदार अरविंद सावंत यांनी देखील पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

"छत्रपती शिवाजी महाराज आणि भगवा यांनाच जीवन मानणारे हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे एक महान राष्ट्रभक्त आणि हिंदुत्वाचे तेजस्वी रूप होते. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्याकडून त्यांनी पुरोगामित्व आणि सामान्य माणसाच्या व्यथांना आवाज देण्याची शिकवण घेतली. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, सीमाप्रश्न या आंदोलनात बाळासाहेबांनी नेतृत्वाची परिसीमा गाठली. राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकीय आणि समाजकारणात चैतन्य फुलविणारे बाळासाहेब लेखक, पत्रकार, व्यंगचित्रकार, परखड वक्ते, मनस्वी कलाकार असे बहुआयामी होते", असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

याचबरोबर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आणि नेतृत्व शब्दांत सामावणे अशक्य आहे. त्यांचे विचार पुढील पिढ्यांना देखील प्रेरणा देत राहतील. सामान्य माणसांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष मैदानात झुंजणाऱ्या, हिंदुत्व आणि मराठी माणसाचा बुलंद आवाज असलेल्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

बाळासाहेबांच्या पुतळ्याचे आज अनावरणबाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा मुंबईतील कुलाबा परिसरातील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात उभारण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा उभारण्यात आलेला हा पहिलाच भव्य पुतळा आहे. नऊ फूट उंच आणि 1200 किलो ब्राँझ धातूपासून या पुतळ्याची निर्मिती करण्यात आली आहे. प्रबोधन प्रकाशनाच्या वतीने या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. या पुतळ्याचे लोकापर्ण आज त्यांच्या 95 व्या जयंतीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अनेक नेत्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. 

टॅग्स :Balasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेMumbaiमुंबई