लोकमत न्यूज नेटवर्क मिरा रोड : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच एकमेव ब्रँड आहेत. बाकी स्वतःला ब्रँड म्हणवणाऱ्यांचा जनता नक्कीच बँड वाजवेल व शेवटच्या स्टँडमध्ये पोहोचवेल, असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव व राज ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. सोमवारी भाईंदरच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालनाच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.
भाईंदरच्या न्यू गोल्डन नेसलगत उभारलेल्या बाळासाहेब ठाकरे कलादालनाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले. यावेळी शिंदे म्हणाले की, "कलादालन पाहताना साक्षात बाळासाहेब समोर असल्याचा भास होतो. येथे जे कोणी येतील ते बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या तेजस्वी भाषणामुळे जाताना प्रेरणा आणि ऊर्जा घेऊन जातील असे हे स्मारक आहे. सरनाईक यांच्या संकल्पनेतून हे उल्लेखनीय काम झाले आहे. जनतेच्या विकासकामांसाठी सर्वात जास्त सह्या आणि निधी सरनाईक यांनीच माझ्याकडून घेतला. तर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, माझ्या राजकीय कारकिर्दीत हजारो विकासकामे केली; परंतु शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कलादालन हे आतापर्यंतचे सर्वोच्च कार्य आहे. आपली नऊ वर्षांची तपश्चर्या आज पूर्ण झाली आहे."
Web Summary : Eknath Shinde asserts Balasaheb Thackeray is the only true brand. He criticized rivals without naming them, stating the public will reject those who self-proclaim as brands. Shinde inaugurated the Balasaheb Thackeray Art Gallery in Bhayander, praising it as inspirational.
Web Summary : एकनाथ शिंदे ने कहा, बालासाहेब ठाकरे ही एकमात्र ब्रांड हैं। उन्होंने नाम लिए बिना विरोधियों पर निशाना साधा और कहा कि जनता स्वयं घोषित ब्रांडों को नकार देगी। शिंदे ने भायंदर में बालासाहेब ठाकरे कला दालान का उद्घाटन किया, और इसे प्रेरणादायक बताया।