शहरं
Join us  
Trending Stories
1
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
2
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
3
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
4
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
5
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
6
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
7
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
8
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
9
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
10
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 12:58 PM

जातीपातींमध्ये विभागलेल्या मराठी माणसाला बाळासाहेबांनी शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली एकत्र आणलं...

बाळ केशव ठाकरे... प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचे चिरंजीव... अन्यायकारक रुढी-परंपरांविरोधात, जातिभेदांविरोधात वडिलांनी पुकारलेला लढा बाळ ठाकरे यांनी अगदी जवळून पाहिला होता, तो त्यांच्या रक्तात भिनला होता. स्वाभाविकच, घरातील प्रबोधनाची परंपरा पुढे नेण्याचं व्रत त्यांनी अंगिकारलं. त्यातूनच जन्माला आली शिवसेना आणि मग बाळ ठाकरे लाखो शिवसैनिकांचे बाळासाहेब होऊन गेले. आज निधनानंतरही ते हिंदूहृदयसम्राट म्हणून लाखो हृदयांमध्ये जिवंत आहेत आणि राहतील.  

देशातीलच नव्हे, तर जगातील काही मोजक्या व्यंगचित्रकारांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आदराने घेतलं जातं. व्यंगचित्रकार म्हणूनच त्यांनी आपली कारकीर्द सुरू केली होती. 'फ्री प्रेस जर्नल' या वृत्तपत्रात त्यांनी असंख्य राजकीय व्यंगचित्र काढली होती आणि देश-विदेशातील नेत्यांना फटकारे लगावले होते. पण, मराठी आणि महाराष्ट्रासाठी काहीतरी करायचंय, या ध्यासापायी त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला होता आणि 'मार्मिक' हे मराठीतील पहिलंवहिलं व्यंगचित्र साप्ताहिक सुरू झालं होतं. 'वाचा आणि थंड बसा' अशी मार्मिक टिप्पणी करत बाळासाहेबांनी अनेक विषयांना वाचा फोडली आणि थंड बसलेली तरुणाई पेटून उठली. महाराष्ट्रावरचं आक्रमण, अन्याय मराठी माणूस सहन करणार नाही, अशी डरकाळी फोडत बाळासाहेबांनी 19 जून 1966 रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली होती. हे नाव त्यांना प्रबोधनकारांनीच सुचवलं होतं. त्यानंतर, महाराष्ट्रभर फिरून, दणदणीत सभा घेऊन, खणखणीत भाषणं करून बाळासाहेबांनी आपले मावळे जमवले होते. राज्यभर शिवसेनेच्या शाखा सुरू करून 80 टक्के समाजकारण, 20 टक्के राजकारणाचं सूत्रं स्वीकारलं होतं. या सूत्रानेच शिवसेनेला सत्तासिंहासनावर नेऊन बसवलं आणि त्याचा 'रिमोट कंट्रोल' बाळासाहेबांच्या हाती दिला, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. 

जातीपातींमध्ये विभागलेल्या मराठी माणसाला बाळासाहेबांनी शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली एकत्र आणलं, अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला शिकवलं, भाषेबद्दल अभिमान बाळगण्याचा मंत्र दिला, संकटसमयी मदतीला धावून जाण्याची शिकवण दिली, ते गिरणी कामगारांचे सुरक्षा कवच झाले, मुंबईतील दंगलीच्या वेळी बाळासाहेबांचा सैनिक हा हिंदूंचा - मराठीजनांचा आधार झाला होता. दसरा मेळाव्यातील त्यांच्या भाषणांनी राजकारणाला नवी दिशा दिली होती. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपासोबत युती करण्याचा निर्णय बाळासाहेबांनी घेतला होता. त्याचं गोड फळ शिवसेना आणि भाजपाला 1995 मध्ये मिळालं होतं, विधानसभेवर भगवा फडकला होता. पण, सत्तेच्या खुर्चीपासून दूर राहून बाळासाहेबांनी आपलं वेगळेपण सिद्ध केलं होतं.  

बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातील वादळच होतं, पण खासगी आयुष्यातील काही वादळांनी त्यांना पार हादरवलं. सावलीसारखी साथ देणाऱ्या पत्नीचं - मीनाताईंचं अचानक जाणं आणि मोठ्या मुलाचं निधन हा बाळासाहेबांसाठी मोठाच धक्का होता. पण, हे दुःख मनाच्या एका कोपऱ्यात ठेवून बाळासाहेब तळपत राहिले, सैनिकांना ऊर्जा देत राहिले.

2012च्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांच्या भाषणाची व्हिडीओ क्लिप दाखवण्यात आली होती. 'मी आता तुमच्यासोबत नसलो तरी माझं मन मी कुणाला दिलं नाही. मी तुमच्या ह्रदयात आहे', हे त्यांचे थकलेले उद्गार सगळ्यांनाच चटका लावून गेले होते. त्यानंतर, 17 नोव्हेंबर 2012 च्या दुपारी बाळासाहेब ठाकरे गेल्याची बातमी आली आणि तमाम शिवसैनिकांना अश्रू अऩावर झाले. त्यांचा गॉड, गाईड, फिलॉसॉफर कायमचा निघून गेला होता. अर्थात, बाळासाहेबांचे विचार आजही सैनिकांना - मराठीजनांना प्रेरणा देत आहेत, आधार देत आहेत - देत राहतील.

टॅग्स :Balasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेShiv Senaशिवसेना