शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

Champa Singh Thapa : नेपाळमधलं गाव ते 'मातोश्री'; वाचा, चंपासिंह थापा कसे बनले बाळासाहेबांचे विश्वासू सेवक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 18:39 IST

Champa Singh Thapa : दसरा मेळाव्यासह अनेक जाहीर सभांमध्ये बाळासाहेबांच्या आसनामागे थापा विनम्रपणे उभे असल्याचं अनेकांनी पाहिलंय. त्यांना पाणी देणं, नॅपकिन देणं, चालताना हात धरून आधार देणं ही जबाबदारी थापा अगदी चोख बजावत.

बाळासाहेब ठाकरे यांना सावलीसारखी साथ देणारे 'सेवक' चंपासिंह थापा (Champa Singh Thapa) यांनी आता शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू अशी ओळख असलेले चंपासिंह थापा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. दसरा मेळाव्यासह अनेक जाहीर सभांमध्ये बाळासाहेबांच्या आसनामागे थापा विनम्रपणे उभे असल्याचं अनेकांनी पाहिलंय. त्यांना पाणी देणं, नॅपकिन देणं, चालताना हात धरून आधार देणं ही जबाबदारी थापा अगदी चोख बजावत.

चंपासिंह थापा हे साधारण 40 वर्षांपूर्वी नेपाळमधून आले होते. गोरेगावमध्ये छोटी-मोठी कामं करत असताना भांडूपमधील नगरसेवक के. टी. थापा यांच्यासह चंपासिह थापा मातोश्रीवर गेले होते. यानंतर ते बाळासाहेबांच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्यासोबत होते. मातोश्रीत आल्यानंतर बाळासाहेबांचा दिनक्रम सांभाळण्याचं महत्त्वाचं काम त्यांनी केलं आणि मनापासून सेवा करणारे चंपासिंह थापा हे बाळासाहेबांचे विश्वासू सेवक झाले. त्यांच्या जेवणाची, औषधाच्या वेळांची, सभांची आणि इतरही अनेक गोष्टींची नीट काळजी घेतली आणि थोड्याच दिवसात ते मातोश्रीचे एक सदस्य झाले. 

नेपाळमध्ये शिवसेनेची उभारणी करण्यात थापा यांची भूमिका महत्त्वाची 

थापा बाळासाहेबांची जिवापाड काळजी घेत होते. मांसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या निधनानंतर बाळासाहेब हळवे झाले तेव्हा थापा यांनी त्यांना मोठा भावनिक आधार दिला होता. मातोश्रीवर बाळासाहेबांच्या खोलीशेजारीच थापाची लहानशी खोली होती. थापा यांचे कुटुंब नेपाळमध्ये असून त्यांना दोन मुलं आहेत. नेपाळमध्ये शिवसेनेची उभारणी करण्यात थापा यांची भूमिका महत्त्वाची होती.  

मातोश्रीसोबत चांगले संबंध

पहिल्यापासून साहेबांसोबत होतो. नेहमीच बरोबर असायचो. मातोश्रीसोबत चांगले संबंध आहेत. साहेबांसोबत एवढे वर्षे राहिलो. यापुढेही आहे असं थापा यांनी काही महिन्यांपूर्वीच सांगितलं होतं. त्यानंतर आता शिंदे गटात प्रवेश केला आहे. नवरात्रीच्या निमित्ताने थापा ठाण्यामध्ये देवीच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे साहेबांना भेटलो. पहिल्यापासून शिवसेनेची सेवा करत होतो आता एकनाथ शिंदे साहेबांसोबत सेवा करणार असल्याचं थापा यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणEknath Shindeएकनाथ शिंदे