शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

हमारा बजाज! मदतीसाठी कोट्यवधींची तिजोरी उघडली; पवारांनी केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 1:15 PM

देशातला नावाजलेला उद्योग समूह असलेला बजाज ग्रुपही सरकारच्या मदतीला धावून आला आहे.

नवी दिल्ली- कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावानं अवघा देश थबकला आहे. अनेकांना घरातच थांबून राहावं लागल्यानं हातावर पोट असणाऱ्यांच्या हालाला पारावार उरलेला नाही. गोरगरीब जनता आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत सतावते आहे. विशेष म्हणजे गोरगरीब जनतेसाठी आरोग्य यंत्रणेला आणखी बळकट करण्यासाठी अनेक उद्योगपती पुढे सरसावले आहेत. देशातला नावाजलेला उद्योग समूह असलेला बजाज ग्रुपही सरकारच्या मदतीला धावून आला आहे. बजाज ग्रुपनं आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी १०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लोकांना चांगली आरोग्य सुविधा मिळणं आवश्यक आहे. त्यासाठी बजाज उद्योग समूह शक्य तितके प्रयत्न करणार आहे. बजाज समूहानं एक निवेदन प्रसिद्ध केले असून, त्यात सगळं नमूद करण्यात आलं आहे. बजाज समूहाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, रोजंदारीवर काम करणारे मजूर, बेघर आणि रस्त्यावर राहणाऱ्या मुलांनाही मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांना अन्नधान्य पुरवठा, गृहनिर्माण, स्वच्छता आणि आरोग्य सेवांकडे पुरविण्याकडे अधिक लक्ष दिले जात असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कोरोना विषाणूचा देशात मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यानंतर लोक आपल्या गावी परतत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या रकमेचा बहुतांश निधी हा ग्रामीण भागात खर्च केला जाणार आहे. कोरोनाविरोधातील या देशाच्या लढ्यात आम्ही १०० कोटी रुपयांचं योगदान देत आहोत. 200 एनजीओंसोबत आम्ही काम करत असून, शक्य तितक्या ग्रामीण भागात पोहोचण्यासाठी प्रयत्नशील आहोत. तसेच गरजू लोकांपर्यंत आवश्यक संसाधने पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.  कोरोनाच्या वाढत्या संक्रमणावर नियंत्रण मिळवण्यासाठी पुण्याची आरोग्यसेवा आणि पायाभूत सेवा मजबूत करण्यावर आमचा भर राहील. १०० कोटींची ही रक्कम सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये आयसीयू, वैद्यकीय उपकरणे, व्हेंटिलेटर आणि वैयक्तिक संरक्षण उपकरणे इ. खरेदी करण्यासाठी वापरली जाईल.या मदतीची रक्कम वेगळं युनिट तयार करण्यासाठी वापरणार असून, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील ग्रामीण भागात एक मोठी मोहीम राबविण्यात येणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विटद्वारे बजाज कंपनीच्या घोषणेविषयी माहिती दिली. गरीब आणि गरजू कुटुंबीयांना कर्जाच्या स्वरूपात पैसे देऊन रोजगार सुरू करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. त्यानंतर जेव्हा कर्जाची परतफेड करण्यात येईल, तेव्हा ते पैसे इतर कुटुंबांना दिले जातील. यामुळे बर्‍याच कुटुंबांना रोजगार मिळण्याची शक्यता वाढेल. तसेच बजाज कंपनी कोरोनावर जनजागृती मोहीम राबविण्यावरही लक्ष केंद्रित केले आहे, जेणेकरून लोकांना या साथीच्या आजारापासून वाचवता येईल.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या