बहुजन भीमसेना देणार श्रीपाल सबनीसांना संरक्षण

By Admin | Updated: January 7, 2016 01:08 IST2016-01-07T01:08:48+5:302016-01-07T01:08:48+5:30

संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बहुजन भीमसेनेच्या

Bahujan Bhimsa to protect Shripal Sabnis | बहुजन भीमसेना देणार श्रीपाल सबनीसांना संरक्षण

बहुजन भीमसेना देणार श्रीपाल सबनीसांना संरक्षण

पिंपरी : संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बहुजन भीमसेनेच्या वतीने सबनीसांना संरक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती मोहन म्हस्के यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
डॉ. श्रीपाल सबनीसांसारख्या बुद्धिवंत विचारांच्या माणसाविरोधी मोर्चा काढणे ही बाब चुकीची आहे. संमेलन उधळून न देता साहित्य संमेलनाचे संरक्षण बहुजन भीमसेना करेल, असे बहुजन भीमसेनेच्या वतीने कळविले आहे. दरम्यान, डॉ. सबनीसांना पिंपरी-चिचंवड कृती समितीचा पाठिंबा आहे.
सबनीसांनी केलेल्या मतांवर काही मंडळींनी आक्षेप घेतले आहेत. यामुळे काही साहित्यप्रेमींमध्ये अस्वस्थता आहे. विचारांचा मुकाबला विचाराने करणे शक्य आहे. यासाठी पुढच्या वाटचालीत अशा घटना घडू नयेत, यासाठी सर्वतोपरी सर्व सेवाभावी संस्थांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा आहे. निवेदनावर विजय जगताप, प्रभाकर ओव्हाळ, सोपान खुडे, मानव कांबळे, सुनील चाबुकस्वार, शेखर घोगरे, लक्ष्म्ण रानवडे, प्रमोद धिवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Bahujan Bhimsa to protect Shripal Sabnis