शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूर सिनेमा पाहून लावला कारागृहाला सुरुंग!

By admin | Updated: April 6, 2015 03:20 IST

कारागृहातून पळालेल्या कैद्यांनी बदलापूर सिनेमा बघून सुरुंग लावला होता. खास सिनेमा बघण्यासाठी सात महिन्यापूर्वी राजा गौसच्या माध्यमातून बॅरॅक-६ मध्ये एलसीडी

जगदीश जोशी, नागपूरकारागृहातून पळालेल्या कैद्यांनी बदलापूर सिनेमा बघून सुरुंग लावला होता. खास सिनेमा बघण्यासाठी सात महिन्यापूर्वी राजा गौसच्या माध्यमातून बॅरॅक-६ मध्ये एलसीडी पोहचविण्यात आली होती. १८ हजारांची एलसीडी बॅरॅकमध्ये आणण्यासाठी राजाने २५ हजार रुपयांची लाच दिल्याची सूत्रांची माहिती आहे. यादिशेने सखोल चौकशी केल्यास कारागृहात तैनात आणखी काही अधिकाऱ्यांचे कारनामे समोर येऊ शकतात, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. याप्रकरणाचा सूत्रधार राजा गौस कोट्याधीश आहे. त्याने साथीदाराच्या मदतीने मध्यप्रदेश, छत्तीसगड, झारखंड, दिल्ली, पंजाब व हरियाणा येथे दरोडे टाकले आहेत. यातून मिळविलेली संपत्ती खास माणसांकडे लपविली आहे. नागपूर पोलिसांच्या हाती लागल्यानंतर राजाने कारागृहातून सुटण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले. त्याच्यावर हत्येचा प्रयत्न, दरोडा, लुटमारीचे १८ गुन्हे दाखल आहे. त्यामुळे राजाची सहज सुटका होणे कठीण आहे. राजाने त्याचा खास सत्येंद्र गुप्ता याला बाहेर पाठविण्याचा निर्णय घेतला होता. त्याने सत्येंद्र, शोएब ऊर्फ शिबू व बिसेन उईकेला जेलच्या बाहेर पाठविण्याची योजना आखली होती. हे तिघेही बॅरॅक नंबर -६ मध्ये होते. या बॅरॅकमध्ये बऱ्याच वर्षांपासून छोटा टीव्ही होता. राजा जेलच्या अधिकाऱ्यांशी बॅरॅकमध्ये एलसीडी लावण्यासाठी बोलला होता. अधिकाऱ्यांनी याबदल्यात २० ते २५ हजारांची लाच मागितली होती. राजा त्यासाठी तयार झाला. एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून बॅरॅक मध्ये एलसीडी पोहचविण्यात आली.